नारायणगाव येथील तमाशा पंढरीत राहुट्या उभारणीला प्रारंभ

नारायणगाव (किरण वाजगे)

ग्रामीण भागात यात्रा जत्रा, उरूस तसेच पारंपारिक उत्सवानिमित्त गावोगावी लोकनाट्य तमाशा ला मोठी मागणी असते. याच अनुषंगाने नारायणगाव येथील तमाशा पंढरी मध्ये तमाशा च्या राहुट्या म्हणजेच तमाशा संपर्क कार्यालय उभारण्याचा शुभारंभ आज नारायणगाव येथील कोल्हेमळा शिवारात करण्यात आला.गेली अनेक वर्षांपासून नारायणगाव येथे गावोगावचे यात्रा कमिटीचे अध्यक्ष तसेच यात्रा कमिटीचे संचालक उरूस, जत्रा यात्रेनिमित्त तमाशा ठरवण्यासाठी नारायणगावच्या तमाशा पंढरीमध्ये येत असतात.

यासाठी राहुट्या उभारणीसाठी आज नारायणगावचे लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे, तसेच विघ्नहर साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, माजी उपसरपंच संतोष वाजगे उद्योजक संजय वारुळे राहुल बनकर, विकास नाना तोडकरी, अजित वाजगे, ईश्वर पाटे, जालिंदर खैरे, आकाश कानसकर, तसेच तमाशा फडमालक मुसा भाई इनामदार, पप्पू मुळे मांजरवाडीकर, मोहित नारायणगावकर, किरणकुमार ढवळपुरीकर तसेच इतर तमाशा फडमालक, कलावंत व ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

येथील कानडे, कोल्हे, तसेच महाजन या ग्रामस्थांनी तमाशा कलावंतांसाठी राहत्या उभारणी करिता मोफत जागा उपलब्ध करून दिली आहे तसेच नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने पुढील दोन ते अडीच महिने मोफत पाणी व कचरा गाडी आदी सोयी-सुविधा दिल्या आहेत.

Previous articleमहाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महिला दिनानिमित्त रणरागिणींच्या सन्मानार्थ आकर्षक सवलती
Next articleडॉ.रविंद्र भोळे यांना “फेस ऑफ इंडिया 2022” अवार्ड प्रदान