महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून महिला दिनानिमित्त रणरागिणींच्या सन्मानार्थ आकर्षक सवलती

पुणे- संपूर्ण जगभरामध्ये ८ मार्च हा दिवस ‘जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. २०२२ च्या जागतिक महिला दिनाची Theme GENDER EQUALITY FOR FOR THE SUSTAINABLE TOMORROW’ म्हणजेच आजची लैंगिक समानता, उद्याची शाश्वती अशी आहे. २१ व्या शतकातील महिला अधिक शाश्वत भविष्य निर्माण करणेकरीता हवामान बदली अनुकूलन, शमन आधि प्रतिसाद यावरील जबाबदारीचे नेतृत्व पार पाडणेकरिता महत्वपूर्ण योगदान देत आहेत हि बाब लक्षात घेता UNITED NATIONS ने सदर थिम जाहीर केली आहे.

 

अगदी सगळयाच क्षेत्रामध्ये अग्रेसरपणे खंबीरपणे परिस्थितींचा सामना करणाऱ्या रणरागिणींना / महिलांना अधिक सक्षम करणेकरीता तसेच त्यांच्या प्रति असलेला आदर, सन्मान, प्रेम व्यक्त करण्यासाठी आपण प्रयत्नशील असणे हे आपले आद्य कर्तव्य असल्याची भावना मा पर्यटन मंत्री आदित्यसाहेब ठाकरे आणि मा. पर्यटन राज्यमंत्री आदीतीताई तटकरे यांनी व्यक्त केली आहे. त्यास अनुसरुन मा. आदित्य ठाकरे साहेब आणि आदीतीताई तटकरे मॅडम यांच्या सुचनेनुसार मा. पर्यटन सचिव बल्सा नायर मॅडम आणि मा. व्यवस्थापकिय संचालिका श्रीमती जयश्री भोज मॅडम यांच्या संकल्पनेतून दि. ८ मार्च २०२२ रोजी महिला दिनाचे औचित्य साधत दि. ६ मार्च २०२२ ते १० मार्च २०२२ या ५ दिवसीय कालावधीत महामंडळाच्या पर्यटक निवासामध्ये वास्तव्यास येणाऱ्या महिला अतिथिना आणि त्यांच्या परिवारास निवासकक्ष आरक्षणावर ५०% सूट देण्याबाबत मान्यता दिली आहे.

सदर ५०% आरक्षणावरील सवलत फक्त रविवार दि. ६ मार्च ते गुरुवार १० मार्च २०२२ या कालावधीकरिताच देण्यात आलेली आहे. तसेच सदरच्या सवलती हया फक्त निवास कक्ष आरक्षणावर ५०% सवलत असून त्यानुसार EP प्लॅन (Only Room) ची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. उपहारगृहांमधील सकाळचा नाश्ता, दुपारचे आणि रात्रीचे जेवण यासाठी ही सवलत लागू नाही. महिला दिनाच्या औचित्याने देण्यात आलेल्या आरक्षण सवलतींना अनुसरून एखाद्या महिलेने कक्षाचे आरक्षण केल्यास सदर आरक्षण रद्द करता येणार नाही, तसेच ज्या महिलांच्या नावे आरक्षण • असेल त्या महिलांनी त्या ठिकाणी आपल्या ओळखपत्रासह उपस्थित राहणे अनिवार्य असणार आहे.

महामंडळाच्या पर्यटक निवासांमध्ये आलेल्या महिला अतिथीचे आगमन होताच त्यांचे विशेष स्वागत करण्यात येणार आहे.

माहिती तंत्रज्ञान शाखेदारे सर्व पर्यटक निवास व्यवस्थापक यांना महिला अतिथीना ५०% आरक्षण सवलत देणेकरिता आवश्यक PROMO CODES संकेतस्थळावर (www.mtde.co) उपलब्ध करुन देण्यात आलेली असून त्यामुळे सदर आरक्षणे पारदर्शक आणि सुरळीत होणार आहेत. Promo Codes हे महामंडळाद्वारे भाडेतत्वावर देण्यात आलेल्या पर्यटक निवासासाठी लागु नाहीत. तसेच या सवलती फक्त निवास कक्ष आरक्षणास वैध असून Extra Beds तसेच conference Halls, lawns करीता लागू असणार नाहीत.

शासनाने कोरोना बाबतचे निबंध शिथील केले असल्याने महामंडळाची सर्वच पर्यटक निवासे मोठया प्रमाणावर आरक्षित होत असुन या उत्साही वातावरणामध्ये सदरच्या सवलतींमुळे पर्यटनाचा आनंद द्विगुणीत तर होणार आहेच, पण महामंडळाकडुन रणरागिणींचा सन्मान केला जात असल्याने महिला पर्यटकांमधुनही समाधान व्यक्त होत असल्याची माहीती महामंडळाचे पुणे विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक श्री. दिपक हरणे यांनी दिली..

Previous articleकिरण बोराडे यांची जिल्हा प्रतिनिधी पदी बिनविरोध निवड
Next articleनारायणगाव येथील तमाशा पंढरीत राहुट्या उभारणीला प्रारंभ