Home Blog Page 77

कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे – महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

कुरकुंभ, सुरेश बागल

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले. वीज सेवा ही अत्यावश्यक सेवेत येते ही सेवा देताना राज्यभरात सुमारे ६५ कंत्राटी कामगार केवळ कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले. कोरोना काळात पोलीस, हॉस्पिटल, कोव्हीड सेंटर, लॅबोरेटरीज् ,आरोग्य यंत्रणा व अन्य सर्व शासकीय व नागरी सुविधांना लागणारा वीज पुरवठा व यंत्रणा सुरळीत ठेवण्यात या वीज कंत्राटी कामगारांचे देखील मोठे योगदान होते. या शासनाच्या अत्यावश्यक वीज सेवेत काम केलेल्या या कोविड योध्यानीं निसर्ग आणि तोंक्ते वादळात देखील शासन सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची व मोलाची भुमिका बजावली त्यामुळे उर्जाखात्याचे विद्यमान मंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी उर्जा खात्यातील कोरोना काळात कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना देखील शासन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना प्राधान्य द्यावे व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी पत्राव्दारे केलेली आहे.

तत्पूर्वी कंत्राटी कामगारांना राज्यभर कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक मानसिक शोषणातून तणावमुक्त करत त्यांना कंत्राटदार मुक्त शाश्वत रोजगार द्यावा. अशी राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आहे.

तसेच मा उर्जा मंत्री व प्रशासन व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या पदाधिकारी यांच्या समावेत चर्चा आयोजित करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.कोरोना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांना शासन सेवेत कायम करणार या महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ ) ने स्वागत केले आहे

नारायणगाव येथे तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे उत्साहात स्वागत

नारायणगाव (किरण वाजगे)

शिवकालाच्या पूर्वीपासून म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाचे नारायण गावात उत्साहात व भक्ती भावात स्वागत करण्यात आले संबळ पिपाणी डफ अशा पारंपारिक वाद्यांच्या वादनासह जुन्नर वरून हा पलंग नारायणगात एक दिवसासाठी मुक्कामी येतो यापूर्वी या पलंगाचे ची निर्मिती घोडेगाव तालुका आंबेगाव येथे झाल्यानंतर निमदरी मार्गे हा पलंग १० दिवस जुन्नर येथे वास्तव्यास असतो छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता यादेखील शिव कालामध्ये या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरून जुन्नर शहरात येत असत.
नारायणगाव येथे मंगळवार दिनांक १३ रोजी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सायंकाळी आगमन झाले येथील लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट तसेच तिळवण तेली समाजाच्या वतीने व नारायणगाव वारूळवाडी गावकऱ्यांच्या वतीने पलंगाचे उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या कमलजामाता मंदिरात हा पलंग भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी महाआरती, तुळजाभवानी देवीची आरती करण्यात आली. व महाप्रसाद वाटण्यात आला. यावेळी २५२५ किलो लापशी प्रसादाचा सुमारे १५ हजार भाविकांनी लाभ घेतला.

बुधवार दिनांक १४ रोजी पहाटे हा पलंग येडगाव मार्गे आळे येथे नेण्यात आला. पुढे हा पलंग राजुरी, अळकुटी जामखेड व पुढे तुळजापूरकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पोहचणार आहे. या पलंगावर तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा होत असते.

पलंग बनविणे, रंग देणे व तुळजापूरला नेणे या संपूर्ण प्रवासात घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ठाकूर कातारी व भागवत सुतार कुटुंबीय आणि नगरचे पलंगे तेली कुटुंबीय यांचे मोलाचे योगदान दरवर्षी असते.

नारायणगाव येथे तुळजाभवानीच्या महाआरतीच्या निमित्ताने सरपंच योगेश पाटे, युवा नेते अमित बेनके, उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे राजश्री बेनके, पुष्पलता जाधव, सुरज वाजगे, विकास सोसायटीचे वाईस चेअरमन किरण वाजगे, संतोष दांगट, मुकेश वाजगे, हितेश कोराळे, निलेश गोरडे, सुजित डोंगरे, निलेश रसाळ, यांच्यासह लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश वालझाडे, उपाध्यक्ष सुदीप कसाबे, कार्याध्यक्ष अनिल दिवटे, सचिव प्रणव भुसारी, सहसचिव तुषार दिवटे, बाळासाहेब दळवी, संजय फल्ले, उल्हास वालझाडे, संजय कसाबे, विशाल मावळे, माणिक मावळे, प्रसाद दळवी, सतीश दळवी, देविदास भोत, हरिदास दिवटे, दत्तात्रय मावळे, गणेश तेली, तसेच फल्ले, रत्नपारखी, भागवत, दिवटे, दळवी, खोंड, भुसारी, मावळे, व तिळवण तेली समाजातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

सकल धनगर मल्हार सेनेच्या शिरुर तालुका ग्रामिण अध्यक्ष पदी कवठे येमाई येथील सा.कार्यकर्ते विठ्ठल किसन घोडे यांची निवड

कवठे येमाई -(प्रतिनिधी धनंजय साळवे )महाराष्ट्रात सकल धनगर मल्हार सेना या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्या संघटनेच्या शिरुर तालुका ग्रामिण अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल किसन घोडे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी केली तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. ग्रामिण भागातील धनगर समाज राजकीय दृष्ट्या सक्रिय व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे.या पदाच्या माध्यमातून तळागाळातील धनगर समाजाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल विठ्ठल घोडे यांनी संघटनेचे आभार मानले व या पदाला न्याय देण्याचा पुर्ण प्रयत्न करीन असे त्यांनी सांगितले.त्यांच्या या निवडी बद्दल पं.सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच मंगलताई रामदास सांडभोर,मा.सरपंच बबनराव पोकळे,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,मा. उपसरपंच निखिल घोडे,ग्रा.सदस्य मधुकर रोकडे,पांडुरंग भोर,सचिन बोर्हाडे,बाळशीराम मुंजाळ,किसन हिलाळ,गणेश उघडे,राजेंद्र ईचके,उत्तम जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

शेतकरी व पशुपालक जनावरांच्या लम्पी आजाराने काळजीत

  1. कवठे यमाई (धनंजय साळवे) – ग्रामिण भागातील शेतकरी व पशुपालक सध्या जनावरांच्या लम्पी आजाराने धास्तावले आहेत.शेतकर्यांना आधीच ओल्या दुष्काळाने त्रस्त केले आहे कांदा टोमॅटो या नगदी पीकांना बाजार नाही.शेतकर्यांना आपले कुटुंब चालवायला गायीच्या दुधाच्या पगारावर कसाबसा आपला संसार चालवावा लागतोय. त्यात ह्या आजाराने डोके वरती काढले आहे.या आजाराने बैलगाडा शर्यतीवरही मर्यादा आल्या आहेत.हा आजार विषाणुजन्य आहे व अतिसंसर्गशील आहे.हा विषाणु देवी प्रवर्गातील कॅप्रीपाॅस गटातील आहे.या रोगाचा प्रसार चावणार्या माशा, डास,गोचीड,चिलटे यापासुन होतो.बाधीत जनावरांच्या संपर्कात चांगले जनावरे आल्यानंतर तसेच दुषित चारा व पाणी पिल्यानेही हा आजार होऊ शकतो.या आजाराची लक्षणे अंगावर मोठ्या गाठी,सुरवातीला भरपूर ताप,डोळ्यातुन नाकातुन चिकट स्राव,चारा पाणी खाणे कमी किंवा बंद तसेच जनावर दुध देण्यास कमी होते.काही जनावरांच्या पायाला सुज येऊन लंगडत चालतात.या रोगांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गोठा स्वच्छ ठेवुन माशा डास किटक गोचीड यावर नियंत्रण ठेवणे,जनावरांचवर उपचार करताना नविन सिरींज वपरावी,गोठ्यामध्ये बाहेरील व्यक्ती तसेच डॉक्टरांचे निर्जंतुकीकरण करावे,आजाराची साथ असेपर्यंत जनावरांची खरेदी विक्री थांबवावी.पशुपालकांनी बाधीत जनावरे तात्काळ वेगळी ठेवावी,गोठ्यामध्ये सोडीअम हायपोक्लोराईड व फिनेल यांची फवारणी करावी.जनावरांना आयव्हरमेक्टींग इंजेक्शन दिल्यासकिटक गोचिड यांवर नियंत्रण येते.गावातही ग्रामपंचायत मार्फत डास मच्छर यावर नियंत्रणासाठी फवारणी करावी.लम्पी आजाराची कोणतीही लक्षणे दिसल्यास पशुवैद्यकिय अधिकारी डाॅ.दत्तात्रय मुने यांच्याशी संपर्क साधावा. पशुपालक व पशुसेवक डॉ.प्रविण भालेराव यांनीही शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेतली व डॉक्टरांचा योग्य सल्ला घेतला तर या आजारावर वेळीच नियंत्रण मिळवता येईल असे सांगितले.लंपी हा आजार फक्त गाय वर्गामध्येच होतो माणसाला या आजारपासून कोणताही धोका नाही

उरूळी कांचन परिसरात गावठी हातभट्टयांवर राज्य उत्पादन शुल्क भरारी पथकाची धडक कारवाई , साडे सात लाखाचा मुद्देमाल जप्त

उरुळी कांचन

राज्य उत्पादन शुल्क  विभागाच्या भरारी पथकाने लोणी काळभोर, शिंदवणे, व उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीत अवैधरित्या गावठी (हातभट्टी) दारू तयार करीत असलेल्या अड्ड्यावर मंगळवारी (ता. १३) पहाटे छापा टाकला आहे.

याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र. २ च्या पोलिसांनी ७ गुन्हे दाखल केले असून शिंदवणे येथील भट्टीमालक असणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना शिवाजीनगर कोर्ट क्र. ७ येथे हजर करण्यात आले आहे.

या छाप्यात पोलिसांनी दोन टेम्पोसह सुमारे ७ लाख ४१ हजार २०० रुपयांचा माल जप्त केला आहे. १४ हजार ३०० लिटर तयार रसायन, २०५० लिटर तयार गावठी दारू जागीच नष्ट केली आहे.

सदराची कारवाई आयुक्त कांतीलाल उमाप, सुनिल चव्हाण यांच्या आदेशानुसार, पुणे विभागाचे विभागीय उप-आयुक्त अनिल चासकर, अधीक्षक सी. बी. राजपुत, उपअधीक्षक संजय आर. पाटील, युवराज एस. शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक तानाजी शिंदे, समीर पाटिल, बाळासाहेब ढवळे दुय्यम निरीक्षक रघुनाथ भोसले, बी. नेवसे, एस. कानेकर व सर्वश्री जवान एस.बी. मांडेकर, के. आर. पावडे, जी. बी. वाव्हळे, एस. घुले, सी. इंगळे यांनी केली आहे.

मसापचा विशेष ग्रंथ पुरस्कार मिळाल्याबद्दल कवी संतोष पवार , उमेश शिरसट यांचा एस. एम.जोशी महाविद्यालयात सत्कार

दिनेश पवार – दौड

रयत शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेजमध्ये नव्वदोत्तरी मराठी कविता संकल्पना स्वरूप आणि वाटचाल या प्रबंधाला उत्कृष्ट प्रबंध लेखनासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा शरच्चंद्र भालेराव पुरस्कार प्रदान करण्यात आला तसेच प्रा. उमेश शिरसट यांना 2019 या वर्षातील महाराष्ट्र साहित्य पत्रिकामधील जी. ए. कुलकर्णी यांच्या कथेवरील लेखाला ताईसाहेब कदम पुरस्कार सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आल्याबद्दल एस. एम. जोशी कॉलेजचे प्राचार्य डॉ. एन. एस. गायकवाड यांनी त्यांचे अभिनंदन केले.याप्रसंगी उपप्राचार्य प्रा . संजय जडे, प्रा. डॉ. किशोर काकडे, डॉ. राजेंद्र ठाकरे उपस्थित होते

कांद्यावरील निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत द्यावी : खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

उरुळी कांचन

कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि निर्यात करात सवलत द्यावी अशी मागणी केली.

गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या आयात – निर्यात धोरणातील धरसोडपणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. कांद्याला चांगला दर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली की निर्यात बंदी आणायची आणि कांदा निर्यात बंदी उठवली की निर्यात करात भरमसाठ वाढ करायची या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ओतूर येथे शेतकऱ्यांचे जन आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर आणि राज्यमंत्री चौधरी यांची भेट घेऊन निर्यात बंदी उठविण्याची तसेच निर्यात करात सवलत देण्याची मागणी केली.

सध्या कांद्याला १४-१५ रुपये किलो दर मिळत आहे. मात्र उत्पादनासाठी १७-१८ रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत कांदा विक्री करावी लागते आहे. त्यामुळे जर निर्यात बंदी उठवली आणि निर्यात कर कमी केले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकेल अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी घेत थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे घातले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी राज्य सरकारने मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमसाठी प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच राज्य सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करणार आपण व आमदार बेनके पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

कांद्यावरील निर्यात बंदी उठवून निर्यात करात सवलत द्यावी : खासदार डॉ. अमोल कोल्हे व आमदार अतुल बेनके यांची केंद्रीय कृषिमंत्र्यांकडे मागणी

नारायणगाव (किरण वाजगे)

जुन्नर तालुक्यात मंगळवार (दि. १३) रोजी होणाऱ्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या आक्रोश आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज खासदार डॉ. अमोल कोल्हे आणि आमदार अतुल बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर आणि कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांची भेट घेऊन कांद्यावरील निर्यात बंदी उठवावी आणि निर्यात करात सवलत द्यावी अशी मागणी केली.

गेल्या काही काळापासून केंद्र सरकारच्या आयात – निर्यात धोरणातील धरसोडपणाचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसतो आहे. कांद्याला चांगला दर मिळेल अशी स्थिती निर्माण झाली की निर्यात बंदी आणायची आणि कांदा निर्यात बंदी उठवली की निर्यात करात भरमसाठ वाढ करायची या धोरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी ओतूर येथे शेतकऱ्यांचे जन आक्रोश आंदोलन होत आहे. या आंदोलनाची दखल घेत खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी केंद्रीय कृषिमंत्री तोमर आणि राज्यमंत्री चौधरी यांची भेट घेऊन निर्यात बंदी उठविण्याची तसेच निर्यात करात सवलत देण्याची मागणी केली.

सध्या कांद्याला १४-१५ रुपये किलो दर मिळत आहे. मात्र उत्पादनासाठी १७-१८ रुपये खर्च येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानीत कांदा विक्री करावी लागते आहे. त्यामुळे जर निर्यात बंदी उठवली आणि निर्यात कर कमी केले तर कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान टळू शकेल अशी भूमिका खासदार डॉ. कोल्हे आणि आमदार बेनके यांनी घेत थेट केंद्रीय कृषिमंत्र्यांना साकडे घातले आहे.

या संदर्भात खासदार डॉ. कोल्हे म्हणाले की, केंद्रीय कृषिमंत्री तोमर यांनी राज्य सरकारने मार्केट इंटरव्हेन्शन स्कीमसाठी प्रस्ताव पाठवावा अशी सूचना केली आहे. त्यानुसार लवकरच राज्य सरकारकडे या संदर्भात पाठपुरावा करणार आपण व आमदार बेनके पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

पाटस येथील नागेश्वर विद्यालयातील (सन १९९५-९६) १० वीचे विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनी पुन्हा आले एकत्र

योगेश राऊत,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस येथील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश्वर विद्यालयाच्या १९९५-९६ मध्ये दहावीत शिक्षण घेतलेल्या माजी विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या वर्ग खोल्या, दरवाजे, खिडक्या व फळ्यांना अंदाजे खर्च १ लाख २५ हजार रुपयाचे रंगकाम करून दिले या कामाचा लोकार्पण सोहळा शनिवार दि १० रोजी पार पडला.या कामामुळे शाळेचे वातावरण प्रसन्न झाले आहे. त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

यावेळी पाटसचे माजी सरपंच योगेंद्र शितोळे, नामदेव शितोळे, यांच्या हस्ते माजी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

तात्कालीन शिक्षक वर्ग, सर्व स्थानिक स्कूल समितीचे सदस्य, मुख्याध्यापक व बॅचचे माजी सर्व विद्यार्थी व रयत सेवक बहुसंख्येने उपस्थित होते. संस्था पदाधिकारी ग्रामस्थ माजी विद्यार्थी पालक व सर्व सेवक हीच प्रत्येक शाळेची सर्वात मोठी ताकद आहे.

जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस

किरण वाजगे,नारायणगाव

चिंचोली काशिद (ता.जुन्नर ) येथील वाजेवाडी शिवारात आठ साडेआठच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाजेवाडी बंधारा फुटला असून बंधाऱ्याचे व पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये तसेच गावात शिरल्यामुळे घरांचे तसेच पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे. अशी माहिती स्थानिक नागरिक व कुलस्वामिनी क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी अरुण काशीद यांनी दिली.

या पावसाचा जोर एवढा होता की केवळ अर्ध्या ते पाऊण तासांमध्ये बंधारा पूर्ण भरून व बंधारा फुटून पाणी घराघरात घुसले.त्याचप्रमाणे वडज भागात देखील पावसाच्या पाण्यामुळे शेतात पाणी घुसले आहे.