Home Blog Page 76

जुन्नर तालुक्यामध्ये “बॉईज थ्री”च्या टीमचे उत्साहात स्वागत

नारायणगाव (किरण वाजगे)

बॉईज थ्री या चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकार नारायणगावात आज त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. या निमित्ताने नारायणगाव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच योगेश पाटे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे नारायणगाव पूर्ववशीवर उत्साहात स्वागत केले .

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर चित्रपटातील मुख्य कलाकार पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, स्नेहल छिंदम, प्रतिक लाड तसेच आपला पहिलाच चित्रपट असलेली विदुला चौगुले या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले त्यांच्या बरोबर नारायणगाव विकास सोसायटीचे व्हॉइस चेअरमन किरण वाजगे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती दिवटे, गणेश पाटे, संतोष दांगट, बाळा वाव्हळ, निलेश दळवी, सागर दहीतुले, विकास फुलसुंदर, ईश्वर पाटे, सागर कुलकर्णी, लक्ष्मी थिएटरचे संचालक श्री व सौ विकी खैरे, प्रवीण जगताप, प्रसाद भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

बॉईज थ्री या चित्रपटातील सर्व कलाकारांनी लक्ष्मी थिएटर येथे प्रेक्षकांसमवेत संवाद साधला. तसेच सुपर श्रीराज हॉटेल येथे दुपारची न्याहारी केली व ते पुढे जुन्नर कडे रवाना झाले.

“ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही ते मतदार संघाचा विकास काय करणार ?

नारायणगाव : (किरण वाजगे)

केंद्रीय आदिवासी मंत्री रेणुका सिंह यांनी गुरुवार (दि. १५) रोजी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या गावात सभा घेऊन थेट डॉ अमोल कोल्हे यांच्यावरच निशाणा साधला आहे.ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही. येथील जनतेचे किती दुर्भाग्य आहे असे सांगत असे लोकप्रतिनिधी असतील तर तुमच्या भागाचा विकास कसा होणार? असा सवाल केलाय.

नारायणगाव येथे भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना हा टोमणा मारलाय.ज्या लोकप्रतिनिधीला मतदार संघात वेळ देता येत नाही ते लोकप्रतिनिधी काय कामाचे अशी थेट कोल्हे यांच्यावर टीका करत शिरुर मध्ये पुढच्या वेळी नक्की कमळ फुलेल असा आशावाद सुद्धा व्यक्त केलाय. या मेळावा प्रसंगी आमदार माधुरी मिसाळ भाजप जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा संघटक धर्मेंद्र खांडरे, माजी आमदार योगेश टिळेकर, माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके, वंदना कोद्,रे शरद बुट्टे पाटील, तालुकाध्यक्ष संतोष तांबे, आशिष माळवदकर, एकनाथ पवार, पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर, विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोष नाना खैरे, नामदेव खैरे, भगवान घोलप, वारूळवाडीचे सरपंच राजेंद्र मेहेर, उपसरपंच माया डोंगरे, अक्षय खैरे, राजश्री काळे आदी मान्यवर उपस्थित होते.

भारत देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आर्थिक सक्षम झाला असून जगभरामध्ये आर्थिक क्षमतेत पाचव्या स्थानावर आहे. मात्र हा परिसर धार्मिक आणि शेती प्रधान असूनही लोकप्रतिनिधी सक्षम नसल्याने मागासला आहे याबद्दल नाराजी व्यक्त करत भाजपा नक्की या परिसराचा विकास करेल असा शब्द दिला.

दरम्यान केंद्रीय मंत्र्यांच्या या वक्तव्यावर खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील आपले प्रत्युत्तर दिले असून ते म्हणाले की ज्या भागातून अष्टविनायक महामार्ग गेला आहे तेथील भूमिपुत्रांचे जमिनीचे पैसे न दिल्यामुळे तेथे रस्ता अरुंद असून रस्त्याचे काम प्रलंबित आहे.

याशिवाय मंत्री महोदयांनी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना देखील या वक्तव्यातून अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. त्याचे कारण देखील चौधरी यांच्या शिरूर लोकसभा मतदारसंघातून भाजपा आपला उमेदवार उभा करणार असल्याच्या वक्तव्यातून सर्वांनाच जाणवले आहे. दरम्यान शिंदे गटाच्या वतीने माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे माजी केंद्रीय मंत्र्यांचे स्वागत करण्यासाठी मंचर मध्ये बराच वेळ थांबले होते त्या सत्काराला देखील टाळल्याने आढळराव पाटील व शिंदे गटातून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

नारायणगावात एका युवकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

किरण वाजगे

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ एका तरुणाचा मृतदेह आज शुक्रवार (दि.१६ ) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना येथील रहिवासी व नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांनी घटनेबाबत ची माहिती दिली त्यानंतर काही वेळातच नारायणगाव पोलिसांनी तेथे येऊन स्पॉट पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

संबंधित तरुणाच्या खिशामध्ये आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मिळाले असून एक पीएमपीएमएल बसच्या प्रवासाचे तिकीट देखील मिळाले आहे. एटीएम कार्ड वर देवानंद बंडू डोंगरदिवे असे नाव असून या तरुणाचा खून झाला आहे की, त्याने स्वतः फाशी घेतली आहे.

याबाबतचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत. दरम्यान नारायणगाव पोलिसांनी फेसबुक द्वारे देवानंद डोंगरदिवे या युवकाचे छायाचित्र मिळवले असून त्याच्या आणि मृतदेहाच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे का याची पडताळणी पोलीस करत आहेत.

कवठे येमाई येथे राजमाता महिला ग्रुप कडुन दांडिया गरभा प्रशिक्षणाचे आयोजन

कवठे येमाई (प्रतिनिधी धनंजय साळवे) – गेली दोन वर्ष कोरोना संकटाच्या आपत्ती मुळे विविध सार्वजनिक उत्सांवावर मर्यादा आलेल्या होत्या. परंतु आता कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे.शासनाने सर्व सार्वजनिक उत्सांवरचे निर्बंध हटविल्यामुळे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले आहेत.गणेशोत्सवानंतर नवरात्रीची चाहुल लागते. नवरात्रीतील दांडीया हा शहरी भागात लोकप्रिय आहे आता ग्रामिण भागात ही तो लोकप्रिय होऊ लागला आहे.महिला वर्गात हे गरभा नृत्य विशेष लोकप्रिय आहे .हिच महिलांची आवड ओळखुन राजमाता महिला गृपने त्यांना गरभा नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाच दिवसाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे.हा वर्ग बुधवार दिनांक 14/09/2022 पासुन रविवार दिनांक 18/09/2022 पर्यंत बालाजी मंगल कार्यालय कवठे येमाई येथे आयोजित केला आहे.त्यासाठी संपर्क सौ.कमलताई दहितुले मो.नं. 9860615485/सौ.रंजना जाधव मो.नं.9923383406 यांच्याशी संपर्क साधावा.

डिंगोरे येथील पुष्पावती नदीवरील कठडे कोसळले

नारायणगाव (किरण वाजगे)

सध्या सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत असतानाच ग्रामस्थांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यातच भर म्हणून की काय, डिंगोरे (ता. जुन्नर) गावातून आमले शिवार व ठाकरवाडीकडे जाणाऱ्या पुष्पावती नदीवर असलेल्या अरूंद पुलावरील कठडे पावसामुळे व इतर कारणांमुळे तुटले आहेत. हे लोखंडी कठडे पडल्याने रहदारी व दळणवळण करणे धोक्याचे झाले आहे. विशेष म्हणजे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांच्या घराकडे जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो.

दरम्यान जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना देखील या पुलाविषयी स्थानिक नागरिकांनी विचारले असता त्यांनी पुलावरील कठडे मंजूर झाले असून लवकर काम सुरू होईल असे आश्वासन दिले आहे. येथील स्थानिक नागरिक पुनम बोराडे तसेच थोरवे भाऊसाहेब यांनी तात्काळ या पुलावर कठडे बसवावेत व नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी केली आहे. दरम्यान पुष्पावती नदीला पूर आल्यामुळे पुलावरून अनेक वेळा पाणी गेल्यामुळे आणखी धोका वाढला आहे.

कोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी

कुरकुंभ, सुरेश बागल

महावितरण, महापारेषण, महानिर्मिती या तिन्ही वीज कंपनीतील नियमित रिक्त पदांवर हजारो वीज कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक यांनी कोरोना काळात आपला जीव धोक्यात घालून काम केले. वीज सेवा ही अत्यावश्यक सेवेत येते ही सेवा देताना राज्यभरात सुमारे ६५ कंत्राटी कामगार केवळ कोरोना काळात कर्तव्यावर असताना मृत्युमुखी पडले. कोरोना काळात पोलीस, हॉस्पिटल, कोव्हीड सेंटर, लॅबोरेटरीज् ,आरोग्य यंत्रणा व अन्य सर्व शासकीय व नागरी सुविधांना लागणारा वीज पुरवठा व यंत्रणा सुरळीत ठेवण्यात या वीज कंत्राटी कामगारांचे देखील मोठे योगदान होते. या शासनाच्या अत्यावश्यक वीज सेवेत काम केलेल्या या कोविड योध्यानीं निसर्ग आणि तोंक्ते वादळात देखील शासन सेवेसाठी अत्यंत महत्त्वाची व मोलाची भुमिका बजावली त्यामुळे उर्जाखात्याचे विद्यमान मंत्री मा. ना.देवेंद्रजी फडणवीस यांनी उर्जा खात्यातील कोरोना काळात कार्यरत वीज कंत्राटी कामगारांना देखील शासन सेवेत सामावून घ्यावे, त्यांना प्राधान्य द्यावे व न्याय मिळवून द्यावा अशी मागणी महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे अध्यक्ष श्री नीलेश खरात व सरचिटणीस सचिन मेंगाळे यांनी पत्राव्दारे केलेली आहे.

तत्पूर्वी कंत्राटी कामगारांना राज्यभर कंत्राटदाराकडून होत असलेल्या आर्थिक मानसिक शोषणातून तणावमुक्त करत त्यांना कंत्राटदार मुक्त शाश्वत रोजगार द्यावा. अशी राज्यातील सर्व वीज कंत्राटी कामगारांना आहे.

तसेच मा उर्जा मंत्री व प्रशासन व महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांच्या पदाधिकारी यांच्या समावेत चर्चा आयोजित करावी अशी मागणी संघटनेने केली आहे.कोरोना काळात सेवा दिलेल्या कंत्राटी कामगारांना शासन सेवेत कायम करणार या महाराष्ट्र शासनाच्या भूमिकेचे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ ) ने स्वागत केले आहे

निधन वार्ता : जुन्या पिढीतील कापड व्यावसायिक माधव क्षीरसागर यांचे वृद्धापकाळाने निधन

किरण वाजगे

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील जुन्या पिढीतील कापड व्यावसायिक माधवराव गणपत क्षीरसागर यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी दुःखद निधन झाले. नारायणगाव येथील कापड व्यावसायिक बाळासाहेब क्षीरसागर व भोला क्षीरसागर यांचे ते वडील होत.

अतिशय शांत व संयमी स्वभाव असणाऱ्या माधव गणपत शिरसागर यांच्या निधनाने अनेकांनी हळहळ व्यक्त केली. श्री हरीस्वामी देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष व कापड व्यापारी असोसिएशनचे माजी अध्यक्ष म्हणून माधव गणपत क्षीरसागर हे कार्यरत होते.

विशेष म्हणजे माधव गणपत क्षीरसागर यांचा आज वाढदिवस होता. बरोबर ९४ वर्षांपूर्वी ते १५ सप्टेंबर १९२८ रोजी आजच्या दिवशीच जन्मले होते. ज्याच दिवशी वाढदिवस त्याच दिवशी मृत्यू असा योग क्षीरसागर यांच्या जीवनात आला.

पाटस येथे गोठ्यातून शेळ्यांची चोरी , अज्ञातांविरुद्ध यवत पोलिसांत गुन्हा दाखल

योगेश राऊत ,पाटस

दौंड तालुक्यातील पाटस येथे रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन अज्ञात चोरांनी गोठ्यातील दोन शेळ्या चोरून नेल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी आहे की रविवार ( ता. ११) रात्री १० च्या सुमारास पाटस दौंड अष्टविनायक मार्गावरील पाटस हद्दीत गार फाटा येथील शेतकरी अमोल होले यांच्या घरासमोरील गोठ्यात एक गाई व तीन शेळ्या होत्या. परंतु सकाळी उठून पाहिले असता होले यांना त्यांच्या गोठ्यात दोन शेळ्या दिसल्या नाहीत. त्यांनी आसपासच्या परिसरात शेळ्यांचा शोध घेतला मात्र त्या सापडल्या नाहीत. रस्त्यालगत घर आणि गोठा असल्याने अज्ञात चोरट्यांनी दोन शेळ्या दावे तोडून चोरून घेऊन गेल्याचा संशय त्यांना आला. या प्रकरणी होले यांनी फिर्याद दिल्याने यवत पोलीस ठाण्यात शेळ्या चोरी केल्याने अज्ञात चोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा अधिक तपास पाटस पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार सागर चव्हाण करत आहेत.
दुचाकी व चारचाकी चोरीच्या घटना सातत्याने घडत आहेत. मात्र आता पाळीव प्राणी चोरी होण्याच्या घटना ही घडू लागल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर

उरुळी कांचन

पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाशी संलग्न, हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघ, हवेली तालुका शिक्षक लोकशाही आघाडी व हवेली तालुका माध्यमिक महिला शिक्षिका संघ यांची सहविचार सभा पुरोगामी माध्यमिक विद्यालय साेरतापवाडी येथे महाराष्ट्र राज्य लोकशाही आघाडीचे कार्याध्यक्ष जी. के. थोरात, पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष वसंतराव ताकवले यांच्या सूचनेनुसार तसेच पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक नाळे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.

सहविचार सभेला प्रमुख पाहुणे म्हणून पुरोगामी माध्यमिक विद्यालय, संस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब चोरगे, सचिव रंगनाथ कड, संचालक भिकाजी चौधरी हे उपस्थित होते. सहविचार सभेमध्ये हवेली तालुका माध्यमिक शिक्षक संघाची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली.

कार्याध्यक्ष-महेश पवार. उपाध्यक्ष -दिलीप थोपटे, सूर्यकांत क्षीरसागर. सहसचिव – चेतन उशिरे, सतीश केकाण. सल्लागार -प्रमोद चव्हाण. संपादक -लालचंद कुंवर.
कोषाध्यक्ष -लक्ष्मण भालसिंग. खजिनदार -अनिल चंद , श्रीरंग जाधव, विशाल भांडवलकर आदींना निवडीचे पत्र देऊन त्यांना शाल ,गुलाब पुष्प ,श्रीफळ देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. सभेचा प्रमुख विषय हवेली माध्यमिक संघाकडून २१ शिक्षकांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून गुणवंत शिक्षक पुरस्कार देण्याचे ठरले.

दिवाळीनंतर गुणवंत शिक्षकांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. असे संघाच्या अध्यक्ष रमेश विचारे, सचिव शरद चौधरी, कार्याध्यक्ष महेश पवार, टी डी एफ चे अध्यक्ष पांडुरंग पवार, उपाध्यक्ष दिलीप थोपटे, सूर्यकांत क्षीरसागर , महिला अध्यक्षा वंदना चौधरी यांनी जाहीर केले.पुणे जिल्हा माध्यमिक शिक्षक संघाचे उपाध्यक्ष अशोक नाळे, मधुकर खरात,टीडीएफचे कार्याध्यक्ष महादेव पाटील, राजेंद्र बोधे जिल्हा प्रतिनिधी यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संघाचे सचिव शरद चौधरी, टीडीएफ चे अध्यक्ष पांडुरंग पवार यांनी केले तर आभार संघाचे कार्याध्यक्ष महेश पवार यांनी मानले

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटीचे रस्ते पाण्याखाली

 श्रावणी कामत

पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत चालु असलेले सायकल ट्रॅक व पादचारी मार्गाच्या नावाखाली रस्त्याचे रुंदीकरणाचे काम पिंपळे सौदागर चालु आहे, रस्तावर पाणी जमा होत असल्याने पादचारी नागरिक व वाहन चालकास खुप त्रास सहन करावा लागत आहे.यावर प्रशासनाने लवकरात लवकर उपाय काढावा अन्यथा आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल,हा सर्व प्रकार पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासन लागु झाल्यापासून प्रशासनाचे दुर्लक्ष करत असल्याने पिंपरी चिंचवड महानगरपालकेचा भोंगळ कारभार, अधिकारी व काॅन्ट्रक्टर यांची मिली भगत असल्याने.
स्थानिक नागरिकाची परेशानी होत आहे,ही बाव निदर्शनास सामाजिक कार्यकर्ते विशाल जाधव आणून दिली प्रशासनाने यावर उपाय न केल्यास आंदोलन करण्यात येईल असे विशाल जाधव यांनी अधिकारी यांना सांगितले.