नारायणगावात एका युवकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला

किरण वाजगे

नारायणगाव (ता. जुन्नर) येथील पुणे नाशिक महामार्गावर मुक्ताई ढाब्याजवळ एका तरुणाचा मृतदेह आज शुक्रवार (दि.१६ ) रोजी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला. याबाबत नारायणगावचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पृथ्वीराज ताटे यांना येथील रहिवासी व नारायणगाव विकास सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजगे यांनी घटनेबाबत ची माहिती दिली त्यानंतर काही वेळातच नारायणगाव पोलिसांनी तेथे येऊन स्पॉट पंचनामा करून मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविला.

संबंधित तरुणाच्या खिशामध्ये आयसीआयसीआय बँकेचे एटीएम मिळाले असून एक पीएमपीएमएल बसच्या प्रवासाचे तिकीट देखील मिळाले आहे. एटीएम कार्ड वर देवानंद बंडू डोंगरदिवे असे नाव असून या तरुणाचा खून झाला आहे की, त्याने स्वतः फाशी घेतली आहे.

याबाबतचा पुढील तपास नारायणगाव पोलीस करत आहेत. दरम्यान नारायणगाव पोलिसांनी फेसबुक द्वारे देवानंद डोंगरदिवे या युवकाचे छायाचित्र मिळवले असून त्याच्या आणि मृतदेहाच्या चेहऱ्यामध्ये साम्य आहे का याची पडताळणी पोलीस करत आहेत.

Previous articleकवठे येमाई येथे राजमाता महिला ग्रुप कडुन दांडिया गरभा प्रशिक्षणाचे आयोजन
Next article“ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही ते मतदार संघाचा विकास काय करणार ?