कवठे येमाई येथे राजमाता महिला ग्रुप कडुन दांडिया गरभा प्रशिक्षणाचे आयोजन

कवठे येमाई (प्रतिनिधी धनंजय साळवे) – गेली दोन वर्ष कोरोना संकटाच्या आपत्ती मुळे विविध सार्वजनिक उत्सांवावर मर्यादा आलेल्या होत्या. परंतु आता कोरोनाची तीव्रता कमी झाली आहे.शासनाने सर्व सार्वजनिक उत्सांवरचे निर्बंध हटविल्यामुळे उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होऊ लागले आहेत.गणेशोत्सवानंतर नवरात्रीची चाहुल लागते. नवरात्रीतील दांडीया हा शहरी भागात लोकप्रिय आहे आता ग्रामिण भागात ही तो लोकप्रिय होऊ लागला आहे.महिला वर्गात हे गरभा नृत्य विशेष लोकप्रिय आहे .हिच महिलांची आवड ओळखुन राजमाता महिला गृपने त्यांना गरभा नृत्याचे प्रशिक्षण देण्यासाठी पाच दिवसाचा प्रशिक्षण वर्ग आयोजित केला आहे.हा वर्ग बुधवार दिनांक 14/09/2022 पासुन रविवार दिनांक 18/09/2022 पर्यंत बालाजी मंगल कार्यालय कवठे येमाई येथे आयोजित केला आहे.त्यासाठी संपर्क सौ.कमलताई दहितुले मो.नं. 9860615485/सौ.रंजना जाधव मो.नं.9923383406 यांच्याशी संपर्क साधावा.

Previous articleडिंगोरे येथील पुष्पावती नदीवरील कठडे कोसळले
Next articleनारायणगावात एका युवकाचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळला