डिंगोरे येथील पुष्पावती नदीवरील कठडे कोसळले

नारायणगाव (किरण वाजगे)

सध्या सर्वत्र जोरदार पर्जन्यवृष्टी होत असतानाच ग्रामस्थांचे तसेच शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे त्यातच भर म्हणून की काय, डिंगोरे (ता. जुन्नर) गावातून आमले शिवार व ठाकरवाडीकडे जाणाऱ्या पुष्पावती नदीवर असलेल्या अरूंद पुलावरील कठडे पावसामुळे व इतर कारणांमुळे तुटले आहेत. हे लोखंडी कठडे पडल्याने रहदारी व दळणवळण करणे धोक्याचे झाले आहे. विशेष म्हणजे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य अंकुश आमले यांच्या घराकडे जाण्यासाठी याच पुलाचा वापर केला जातो.

दरम्यान जिल्हा परिषद सदस्य मोहित ढमाले यांना देखील या पुलाविषयी स्थानिक नागरिकांनी विचारले असता त्यांनी पुलावरील कठडे मंजूर झाले असून लवकर काम सुरू होईल असे आश्वासन दिले आहे. येथील स्थानिक नागरिक पुनम बोराडे तसेच थोरवे भाऊसाहेब यांनी तात्काळ या पुलावर कठडे बसवावेत व नागरिकांचा जीव वाचवावा अशी मागणी केली आहे. दरम्यान पुष्पावती नदीला पूर आल्यामुळे पुलावरून अनेक वेळा पाणी गेल्यामुळे आणखी धोका वाढला आहे.

Previous articleकोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी
Next articleकवठे येमाई येथे राजमाता महिला ग्रुप कडुन दांडिया गरभा प्रशिक्षणाचे आयोजन