जुन्नर तालुक्यामध्ये “बॉईज थ्री”च्या टीमचे उत्साहात स्वागत

नारायणगाव (किरण वाजगे)

बॉईज थ्री या चित्रपटाचे दिग्दर्शक व कलाकार नारायणगावात आज त्यांच्या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी आले होते. या निमित्ताने नारायणगाव नगरीचे प्रथम नागरिक सरपंच योगेश पाटे तसेच स्थानिक ग्रामस्थांनी त्यांचे नारायणगाव पूर्ववशीवर उत्साहात स्वागत केले .

याप्रसंगी चित्रपटाचे दिग्दर्शक विशाल देवरुखकर चित्रपटातील मुख्य कलाकार पार्थ भालेराव, सुमंत शिंदे, स्नेहल छिंदम, प्रतिक लाड तसेच आपला पहिलाच चित्रपट असलेली विदुला चौगुले या कलाकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेतले त्यांच्या बरोबर नारायणगाव विकास सोसायटीचे व्हॉइस चेअरमन किरण वाजगे, ग्रामपंचायत सदस्य ज्योती दिवटे, गणेश पाटे, संतोष दांगट, बाळा वाव्हळ, निलेश दळवी, सागर दहीतुले, विकास फुलसुंदर, ईश्वर पाटे, सागर कुलकर्णी, लक्ष्मी थिएटरचे संचालक श्री व सौ विकी खैरे, प्रवीण जगताप, प्रसाद भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते.

बॉईज थ्री या चित्रपटातील सर्व कलाकारांनी लक्ष्मी थिएटर येथे प्रेक्षकांसमवेत संवाद साधला. तसेच सुपर श्रीराज हॉटेल येथे दुपारची न्याहारी केली व ते पुढे जुन्नर कडे रवाना झाले.

Previous article“ज्या खासदारांच्या घराकडे जाणारा रस्ता सुद्धा पक्का नाही ते मतदार संघाचा विकास काय करणार ?
Next articleघोडेगाव येथे लंम्पी या रोगावर जनावरांसाठी मोफत लसीकरण मोहिम सुरु