घोडेगाव येथे लंम्पी या रोगावर जनावरांसाठी मोफत लसीकरण मोहिम सुरु

घोडेगाव- ग्रामपंचायत हद्दीतील जनावरांच्या लंपी प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरण मोहीम सुरू केली आहे. सदर लसीकरण हे शशिकला सोपान चिखले, सौ क्रांती प्रशांत गाढवे सरपंच घोडेगाव तसेच सोमनाथ वसंतराव काळे उपसरपंच घोडेगाव यांच्या सौजन्याने उपलब्ध केली आहे .

या लसीकरण मोहिमेसाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर अतुल चिखले तसेच समीर घोडेकर यांचे सहकार्य लाभले.

यावेळी संदीप काळे मंजुनाथ काळे रघुनाथ काळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleजुन्नर तालुक्यामध्ये “बॉईज थ्री”च्या टीमचे उत्साहात स्वागत
Next articleग्रामीण भागात वेस्ट मार्केट वेबसिरीजच्या माध्यमातून समाजप्रबोधन