ग्रामीण भागात वेस्ट मार्केट वेबसिरीजच्या माध्यमातून समाजप्रबोधन

योगेश राऊत ,पाटस

ग्रामीण भागातुन उदरनिर्वाह करण्यासाठी नोकरदार वर्ग शहरी भागात जातो व ऐशआराम जिवन जगतो ग्रामीण भागातील समस्या या शहरी भागापेक्षा भरपुर वाढलेल्या असतात यामध्येच सद्यस्थितीला ग्रामीण भागातील तरुण शिकलेला आसुन बेरोजगार होत आहे.या बेरोजगारीतुन नोकरी मिळत नसल्याने तरुण पीडी ही वाम मार्गाला जाता आहे व गुन्हेगारी वृत्तीला बळी पडतात, त्यामुळे या काळामध्ये तरुण वर्गाला प्रबोधन करणे गरजेचे आहे.

या वेस्ट मार्कट हिंदी वेब सिरीज मधुन दाखवण्यात येत आहे पोलीस यंत्रणा गुन्हेगारांना पकडण्यात का अपयशी ठरतात व यातुन पोलीस प्रशासन यंत्रनेला कश्या अडचणी निर्माण होतात. तसेच महीलांचे संरक्षण कसे करायचे तरुण पीडीची सुरवात व नंतर ऱ्हास कसा होतो ही वेब सिरीज ग्रामीण भागातील तरुणांनी एकत्र येवुन पहीलांदाच हिंदी वेबसिरीज सुरु केली आसुन ग्रामीण भागातुन मोठया प्रमाणावर ग्रामस्थांन कडुन सहकार्य होत आहे.

याची संकल्पना  अविराज काळे व निर्माते प्रमोद आबनवे यांनी केली आसुन यामध्ये कलाकार गोपीनाथ हंडाळ ,विजय टेंगले, राजु भनभने,विकास शेळके, रेणुका साठे ,महादेव फणसे, जयदिप लबडे ,महेश शिंदे ,महेश हांडे ,गणेश गायकवाड,सौरभ गडेकर,अनिकेत गडेकर,अमन शहा आदी कलाकार आहेत छायाचित्रकार अविराज काळे तर प्रोडक्शन प्रमुख विजय राऊत, आयुष खरे यांनी केले आहे.अशी माहीती अविराज काळे यांनी दिली.

Previous articleघोडेगाव येथे लंम्पी या रोगावर जनावरांसाठी मोफत लसीकरण मोहिम सुरु
Next articleपंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन शेतकऱ्याची आत्महत्या