नारायणगाव येथे तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे उत्साहात स्वागत

नारायणगाव (किरण वाजगे)

शिवकालाच्या पूर्वीपासून म्हणजे छत्रपती शिवरायांच्या जन्मापूर्वी अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या श्री तुळजाभवानी मातेच्या पलंग उत्सवाचे नारायण गावात उत्साहात व भक्ती भावात स्वागत करण्यात आले संबळ पिपाणी डफ अशा पारंपारिक वाद्यांच्या वादनासह जुन्नर वरून हा पलंग नारायणगात एक दिवसासाठी मुक्कामी येतो यापूर्वी या पलंगाचे ची निर्मिती घोडेगाव तालुका आंबेगाव येथे झाल्यानंतर निमदरी मार्गे हा पलंग १० दिवस जुन्नर येथे वास्तव्यास असतो छत्रपती शिवरायांच्या मातोश्री जिजामाता यादेखील शिव कालामध्ये या पलंगाचे दर्शन घेण्यासाठी शिवनेरी किल्ल्यावरून जुन्नर शहरात येत असत.
नारायणगाव येथे मंगळवार दिनांक १३ रोजी अंगारकी चतुर्थीच्या दिवशी तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे सायंकाळी आगमन झाले येथील लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्ट तसेच तिळवण तेली समाजाच्या वतीने व नारायणगाव वारूळवाडी गावकऱ्यांच्या वतीने पलंगाचे उत्साहात वाजत गाजत स्वागत करण्यात आले.

श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात असलेल्या कमलजामाता मंदिरात हा पलंग भाविकांच्या दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. यावेळी महाआरती, तुळजाभवानी देवीची आरती करण्यात आली. व महाप्रसाद वाटण्यात आला. यावेळी २५२५ किलो लापशी प्रसादाचा सुमारे १५ हजार भाविकांनी लाभ घेतला.

बुधवार दिनांक १४ रोजी पहाटे हा पलंग येडगाव मार्गे आळे येथे नेण्यात आला. पुढे हा पलंग राजुरी, अळकुटी जामखेड व पुढे तुळजापूरकडे दसऱ्याच्या आदल्या दिवशी पोहचणार आहे. या पलंगावर तुळजाभवानी मातेची श्रमनिद्रा होत असते.

पलंग बनविणे, रंग देणे व तुळजापूरला नेणे या संपूर्ण प्रवासात घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील ठाकूर कातारी व भागवत सुतार कुटुंबीय आणि नगरचे पलंगे तेली कुटुंबीय यांचे मोलाचे योगदान दरवर्षी असते.

नारायणगाव येथे तुळजाभवानीच्या महाआरतीच्या निमित्ताने सरपंच योगेश पाटे, युवा नेते अमित बेनके, उपसरपंच आरिफ आतार, माजी उपसरपंच संतोष वाजगे राजश्री बेनके, पुष्पलता जाधव, सुरज वाजगे, विकास सोसायटीचे वाईस चेअरमन किरण वाजगे, संतोष दांगट, मुकेश वाजगे, हितेश कोराळे, निलेश गोरडे, सुजित डोंगरे, निलेश रसाळ, यांच्यासह लक्ष्मीनारायण देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश वालझाडे, उपाध्यक्ष सुदीप कसाबे, कार्याध्यक्ष अनिल दिवटे, सचिव प्रणव भुसारी, सहसचिव तुषार दिवटे, बाळासाहेब दळवी, संजय फल्ले, उल्हास वालझाडे, संजय कसाबे, विशाल मावळे, माणिक मावळे, प्रसाद दळवी, सतीश दळवी, देविदास भोत, हरिदास दिवटे, दत्तात्रय मावळे, गणेश तेली, तसेच फल्ले, रत्नपारखी, भागवत, दिवटे, दळवी, खोंड, भुसारी, मावळे, व तिळवण तेली समाजातील अनेक भाविक भक्त उपस्थित होते.

Previous articleसकल धनगर मल्हार सेनेच्या शिरुर तालुका ग्रामिण अध्यक्ष पदी कवठे येमाई येथील सा.कार्यकर्ते विठ्ठल किसन घोडे यांची निवड
Next articleकोरोना काळात काम केलेल्या वीज कंत्राटी कामगारांना नोकरीत प्राधान्य द्यावे – महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांची मागणी