सकल धनगर मल्हार सेनेच्या शिरुर तालुका ग्रामिण अध्यक्ष पदी कवठे येमाई येथील सा.कार्यकर्ते विठ्ठल किसन घोडे यांची निवड

कवठे येमाई -(प्रतिनिधी धनंजय साळवे )महाराष्ट्रात सकल धनगर मल्हार सेना या सामाजिक व राजकीय क्षेत्रात काम करणार्या संघटनेच्या शिरुर तालुका ग्रामिण अध्यक्षपदी सामाजिक कार्यकर्ते विठ्ठल किसन घोडे यांची निवड संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रल्हाद भाऊ सोरमारे यांनी केली तसे नियुक्ती पत्र त्यांना देण्यात आले. ग्रामिण भागातील धनगर समाज राजकीय दृष्ट्या सक्रिय व आर्थिक दृष्ट्या सक्षम करणे हे संघटनेचे उद्दिष्ट आहे.या पदाच्या माध्यमातून तळागाळातील धनगर समाजाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल विठ्ठल घोडे यांनी संघटनेचे आभार मानले व या पदाला न्याय देण्याचा पुर्ण प्रयत्न करीन असे त्यांनी सांगितले.त्यांच्या या निवडी बद्दल पं.सदस्य डॉ.सुभाष पोकळे,सरपंच मंगलताई रामदास सांडभोर,मा.सरपंच बबनराव पोकळे,उपसरपंच विठ्ठल मुंजाळ,मा. उपसरपंच निखिल घोडे,ग्रा.सदस्य मधुकर रोकडे,पांडुरंग भोर,सचिन बोर्हाडे,बाळशीराम मुंजाळ,किसन हिलाळ,गणेश उघडे,राजेंद्र ईचके,उत्तम जाधव यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

Previous articleशेतकरी व पशुपालक जनावरांच्या लम्पी आजाराने काळजीत
Next articleनारायणगाव येथे तुळजाभवानी मातेच्या पलंगाचे उत्साहात स्वागत