Home Blog Page 78

जेष्ठ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे वृद्धापकाळाने निधन

कुरकुंभ : सुरेश बागल

जेष्ठ संघ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी पुणे येथे अल्पशा आजाराने शुक्रवार (दि.९) रोजी
निधन झाले.त्यांचा जन्म २०/९/१९२९ रोजी झाला.त्यांचे एम.ए. एल.एल. बी. शिक्षण झाले. साधारणपणे १९५१ च्या दरम्यान त्यांनी आसाम मध्ये संघाचे प्रचारक म्हणून काम केले.प्रचारक म्हणून थांबल्यावर त्यांनी दादर, मुंबई येथे संघाचे काम केले.त्याच काळात साप्ताहिक विवेक मध्ये त्यांनी काही वर्ष काम केले.स्वताचा चरितार्थ चालविण्यासाठी त्यांनी ग्लॅक्सो इंडिया मध्ये नोकरी सुरू केली.तेथे एक्झिक्युटिव्ह (पर्सोनेल) म्हणून निवृत्त झाले.सेवा निवृत्ती नंतर ते पुण्यात स्थायिक झाले.

पुण्यात भारतीय मजदूर संघ,स्वरूप वर्धिनी,श्रम सेवा न्यास ,ग्राम विकास संस्था यांच्या कामाशी ते जोडलेले होते.अनेक संस्थांना त्यांनी सढळ हाताने मदत केली.गरजू व्यक्तींनाही शिक्षणासाठी व स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी ते मदत करत असत.बुद्धीप्रामाण्य, तर्कशुद्ध विचार, अत्यंत संवेदनशीलता,गरीब व शोषित याच्या बद्दल कळवळा, मदतीचा स्वभाव, वक्तशीरपणा हे त्यांचे विशेष गुण होते. त्यांच्या पश्चात पत्नी, लहान बहीण पुतणे, पुतण्या,भाचे असा मोठा परिवार आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेला शेतकरी बांधव नुकसान, भरपाई पंचनाम्यापासून कोणीही वंचित राहता कामा नये – आमदार अशोक पवार

उरुळी कांचन

शेतकरी बांधवांचे मोठ्या प्रमाणावर परतीच्या पावसाने नुकसान झाले असून कृषी विभागाच्या वतीने करण्यात येणाऱ्या नुकसान भरपाई पंचनामे पासून कोणताही शेतकरी वंचित राहता कामा नये यांची विशेष दखल कृषी विभागाने घ्यावी यासंदर्भात गावचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य घ्यावे असे आवाहन शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी उरुळी कांचन (ता.हवेली) ग्रामपंचायत मध्ये बोलविण्यात आलेल्या आढावा बैठकीत कृषी विभागाच्या संबंधित आधिकारी वर्गाला आवाहन केले.यावेळी तालुक्याच्या तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील उपस्थित होत्या.

यावेळी उरुळी कांचनचे सरपंच राजेंद्र कांचन, पु.जि.नि.स.सदस्य संतोष कांचन, माजी सरपंच दत्तात्रय कांचन, पंचायत समितीच्या सदस्या हेमलता बडेकर, महात्मा गांधी सर्वोदय संघाचे विश्वस्त राजेंद्र टिळेकर, माजी सरपंच संतोष कांचन, सरपंच विठ्ठल शितोळे, ग्रामपंचायत सदस्य अमित कांचन, भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, शंकर बडेकर, सुनिल तांबे, सुभाष बगाडे, माजी सरपंच आण्णा महाडिक, आदित्य कांचन, अमित चौधरी, अर्जुन कांचन, शहर अध्यक्ष रामदास तुपे, तालुका अध्यक्ष ओबीसी सुभाष टिळेकर, मंडलाधिकारी नूरजहाँ सय्यद, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे, मंडळ कृषी अधिकारी जि. के.कडलग, ग्रामविकास अधिकारी यशवंत डोळस, जगदीश महाडिक, राजेंद्र बगाडे, राजेंद्र टिळेकर, आप्पा डोंबे, दत्तात्रय काकडे, पोलीस पाटील वर्षा कड, विजय टिळेकर, पत्रकार सुनिल जगताप, सुवर्णा कांचन, जयदीप जाधव, नितीन करडे सह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

पंचनामे करत असताना किंवा शासकीय अनुदान संदर्भात पिकपाहणी नोंद न झाल्याने येणाऱ्या अडचणी संदर्भात अनेक शेतकरी बांधवांनी प्रश्न उपस्थित केला. याबद्दल लवकरच जनजागृती बाबतीत मेळावा घेण्याचे तहसीलदार तृप्ती कोलते-पाटील यांनी सांगितले.

नारायणगावात मध्यरात्री दीड वाजता सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन

नारायणगाव : ( किरण वाजगे)

नारायणगाव व परिसरामधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक दुपारनंतर पाऊस न आल्याने उत्साहात व वाजत गाजत पार पडली. सर्वात शेवटी विरोबा गणेशोत्सव मंडळ व विक्रांत क्रीडा मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होत्या. या मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे वारूळवाडी येथील नवशक्ती मंडळांने सादर केलेला बिबट सफारी देखावा मिरवणुकीचे आकर्षण ठरला. अखेरच्या विक्रांत क्रीडा मंडळ वाजगे आळीच्या गणपतीचे सव्वा ते दीड वाजण्याच्या सुमारास विसर्जन झाले.यावेळी आमदार अतुल बेनके तसेच सरपंच योगेश पाटे यांनी नारायणगावातील सर्वच गणेश मंडळांना भेटी दिल्या.

गावातील प्रमुख मंडळांपैकी औदुंबर गणेश मंडळ, मुक्ताबाई मंडळ विटे कोराळे मळा, शिवझुंजार मंडळ खैरे मळा, नवनाथ मंडळ वाजगे डिंबळे मळा, गणेश मित्र मंडळ शेटे मळा, नारायणवाडी मंडळ, हनुमान चौक, श्रीराम चौक, महासुर्योदय मित्र मंडळ, प्रियदर्शनी मित्र मंडळ, संत सावतामाळी मित्र मंडळ कोल्हे मळा,भागेश्वर मित्र मंडळ, नव झुंजार मित्र मंडळ चिमणवाडी, नवशक्ती मित्र मंडळ, प्रगती मित्र मंडळ, यावर्षी नव्याने सुरू झालेले वेध मित्र मंडळ, इंदिरानगर मावळे आळी, कुलस्वामी मंडळ पेठ आळी, शिवविहार मित्र मंडळ, नारायणगाव एसटी डेपो व आदर्श मित्र मंडळ या सर्वच सार्वजनिक मंडळांनी आकर्षक फुलांच्या सजावटी करून मिरवणुकीत सहभाग घेतला.

विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे नवशक्ती मित्र मंडळ वारूळवाडी यांनी बिबट सफारी बाबतचा देखावा सादर केला. तसेच गणेश मित्र मंडळ शेटे मळा यांनी फुलांनी सजवलेला नागराज रथ, विरोबा मंडळ पाटे आळीचा प्रकाश रथ, वाजगे आळीचा मूषक रथ, नऊ झुंजार चिमणवाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ज्वलंत देखावा, संत सावतामाळी मित्र मंडळाचे ढोल लेझीम महिला पथक, महासूर्योदय मित्र मंडळाची बैलगाडी व पालखी मध्ये ठेवलेला गणेश, औदुंबर मंडळाचा कोरोना विषाणू विषयीचा ज्वलंत देखावा हे गणपती सर्वात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली सार्वजनिक गणेश मंडळे होती.

विसर्जन मिरवणुकीमध्ये नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत कक्ष उभारून प्रत्येक गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे तीन टन निर्माल्य व प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

नारायणगावात मध्यरात्री दीड वाजता सार्वजनिक गणेश मंडळाचे विसर्जन

नारायणगाव : (किरण वाजगे)

नारायणगाव व परिसरामधील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची मिरवणूक दुपारनंतर पाऊस न आल्याने उत्साहात व वाजत गाजत पार पडली. सर्वात शेवटी विरोबा गणेशोत्सव मंडळ व विक्रांत क्रीडा मंडळाच्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात आले. सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या विसर्जन मिरवणुका रात्री दीड वाजेपर्यंत सुरू होत्या. अखेरच्या विक्रांत क्रीडा मंडळ वाजगे आळीच्या गणपतीचे सव्वा ते दीड वाजण्याच्या सुमारास विसर्जन झाले.

गावातील प्रमुख मंडळांपैकी औदुंबर गणेश मंडळ, मुक्ताबाई मंडळ विटे कोराळे मळा, शिवझुंजार मंडळ खैरे मळा, नवनाथ मंडळ वाजगे डिंबळे मळा, गणेश मित्र मंडळ शेटे मळा, नारायणवाडी मंडळ, हनुमान चौक, श्रीराम चौक, महासुर्योदय मित्र मंडळ, प्रियदर्शनी मित्र मंडळ, संत सावतामाळी मित्र मंडळ कोल्हे मळा, भागेश्वर मित्र मंडळ, नव झुंजार मित्र मंडळ चिमणवाडी, नवशक्ती मित्र मंडळ, प्रगती मित्र मंडळ, यावर्षी नव्याने सुरू झालेले वेध मित्र मंडळ, इंदिरानगर मावळे आळी, कुलस्वामी मंडळ पेठ आळी, शिवविहार मित्र मंडळ, नारायणगाव एसटी डेपो व आदर्श मित्र मंडळ या सर्वच सार्वजनिक मंडळांनी आकर्षक फुलांच्या सजावटी करून मिरवणुकीत सहभाग घेतला.

विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे गणेश मित्र मंडळ शेटे मळा यांनी फुलांनी सजवलेला नागराज रथ, विरोबा मंडळ पाटे आळीचा प्रकाश रथ, वाजगे आळीचा मूषक रथ, नऊ झुंजार चिमणवाडीचा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावरील ज्वलंत देखावा, संत सावतामाळी मित्र मंडळाचे ढोल लेझीम महिला पथक, महासूर्योदय मित्र मंडळाची बैलगाडी व पालखी मध्ये ठेवलेला गणेश, औदुंबर मंडळाचा कोरोना विषाणू विषयीचा ज्वलंत देखावा हे गणपती सर्वात आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरलेली सार्वजनिक गणेश मंडळे होती.
विसर्जन मिरवणुकीमध्ये नारायणगाव ग्रामपंचायत च्या वतीने स्वागत कक्ष उभारून प्रत्येक गणपतीवर पुष्पवृष्टी करण्यात आली. तसेच डॉ नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने सुमारे तीन टन निर्माल्य व प्लास्टिक कचरा जमा करण्यात आला.

उंडवडीत आमदार राहुल कुल यांच्या हस्ते विविध विकासकामांचे भूमिपूजन

उरुळी कांचन

आमदार राहुल कुल यांच्या शुभहस्ते उंडवडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन समारंभ संपन्न झाला. उंडवडी गावठाण येथे नळ पाणीपुरवठा योजना, उंडवडी सौंदडवाडी बंदिस्त गटर लाईन भूमीपूजन व ग्रामपंचायत उंडवडी बहुउद्देशीय सभागृह, जि.प. प्राथमिक शाळा भोसलेवाडी इमारत व सांस्कृतिक स्टेज, जि. प. प्राथमिक शाळा उंडवडी इमारत व सांस्कृतिक स्टेज , उंडवडी गावठाण जलशुद्धीकरण खोली जिल्हा भोसलेवाडी स्मशानभूमी सुशोभीकरण, पोलीस पाटील कार्यालय या कामांचा लोकार्पण सोहळा आमदार राहुल कुल यांच्या शुभहस्ते पार पडला.

याप्रसंगी उपस्थित महालक्ष्मी उद्योग समूह विशाल भोसले, उद्योजक शामराव दोरगे, भीमा सहकारी साखर कारखाना संचालक माणिक कांबळे, सरपंच दिलीप देशमुख , उपसरपंच सुभाष यादव, उपसरपंच रवींद्र होले, भाजपचे जेष्ठ नेते तानाजी दिवेकर, मा सरपंच पांडुरंग आखाडे, ग्रा.प. सदस्य दत्तात्रय आखाडे, संभाजी नातू , उंडवडी ग्रामपंचायत विद्यमान सरपंच दीपमलाताई सतीश जाधव, विद्यमान उपसरपंच विकास सुभाष कांबळे, ग्रामपंचायत सदस्या मैनाताई गुंड, श्रीमती विमल जाधव, सदस्या सुनील नवले सदस्य, पोलीस पाटील राजेंद्र जगताप, मा. तंटामुक्ती अध्यक्ष सचिन गुंड, मा. सरपंच विकास सोनवणे, मा. उपसरपंच लक्ष्मण भंडलकर, मा. सरपंच मुरलीधर भोसले, पाणीपुरवठा अध्यक्ष संपत टिळेकर, रवी पांढरे, भिकू कांबळे आणि सर्व ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यमान तंटामुक्ती अध्यक्ष दिनेश गडदे यांनी केले व आभार उपसरपंच विकास कांबळे यांनी केले.

जनार्दन दांडगे यांची भाजपाच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती

उरुळी कांचन

लोणी काळभोर (ता.हवेली) येथील जनार्दन दांडगे यांची भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा सोशल मीडिया अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. नुतन प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले.

याप्रसंगी आमदार राहुल कुल, आमदार भिमराव तापकीर, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री विजय शिवतारे, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदिप कंद, जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, प्रदेश कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, धर्मेंद्र खांडरे, प्रविण काळभोर, राहुल शेवाळे, दादासाहेब सातव, विकास जगताप, अजिंक्य कांचन, श्रीकांत कांचन, कमलेश काळभोर, पत्रकार सुनिल जगताप, जयदीप जाधव आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पक्षाने दिलेल्या संधीचे संघटनेच्या माध्यमातून संघटन कशाप्रकारे वाढेल या दुष्टीने प्रयत्न करणार असल्याचे मत नुतन सोशल मीडिया पुणे जिल्हा अध्यक्ष जनार्दन दांडगे यांनी सांगितले.

डॉ मणिभाई देसाई पतसंस्था सभासदांना १५ टक्के लाभांश देणार- राजेंद्र कांचन

उरुळी कांचन

डॉ मणिभाई देसाई सहकारी पतसंस्थेची २९ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थेच्या मुख्यकार्यालयात पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन होते. यावेळी बहुसंख्येने सर्व शाखेचे सभासद उपस्थित होते.

संस्थेच्या ३१ मार्च २०२२ अखेर ठेवी २२५ कोटी ४४ लाख, कर्ज १६५ कोटी ९० लाख व गुंतवणूक ८८ कोटी १३ लाख रुपये आहे. संस्थेस ४ कोटी ९० लाख ढोबळ नफा व तरतुदी केल्यानंतर २ कोटी ९७ लाख निव्वळ नफा झाला आहे. पतसंस्थेतर्फे सभासदांना १५ टक्के लाभांश देणार असल्याची माहिती डॉ मणिभाई देसाई पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी जाहीर केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त संस्थेच्या वतीने १०० महिन्यात मणिअमृतमहोत्सव दामदुप्पट ठेव योजना सुरु करणार असल्याचे अध्यक्ष राजेंद्र कांचन यांनी सभासदांना मार्गदर्शन करताना सांगितले. संस्थेचे सभासद असलेले उरुळी कांचन सरपंचपदी निवड झाल्याबद्दल राजेंद्र बबन कांचन, खामगाव टेकच्या उपसरपंचपदी निवड झाल्याबद्दल मारुती किसन थोरात यांचा सत्कार करण्यात आला. नियमित कर्ज भरणाऱ्या कर्जदारांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

संस्थेच्या वार्षिक सभेचे कामकाज खेळीमेळीच्या वातावरणात पार पडले. संस्थेचे प्रेरणास्थान डॉ मणिभाई देसाई यांच्या प्रतिमेचे पुजन व दिपप्रज्वलन माऊली कांचन, कोंडीराम चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी सभासदांनी आपल्या सुचना मांडल्या त्यामध्ये केडगाव शाखेचे सल्लागार शिवाजी सोनवणे, व्यापारी असोसिएशनचे शहर अध्यक्ष संतोष कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, रंगनाथ कड, लक्ष्मण म्हस्के, शांताराम चौधरी, अशोक टिळेकर, सुरेश सातव, बाळासाहेब चौधरी, इ. समावेश होता. सदर सभेस संचालक शरद वनारसे, सुभाष धुकटे, भाऊसाहेब कांचन, कांतीलाल चौधरी, संजय कांचन, खेमचंद पुरुसवाणी, चंद्रकांत लोणारी, बाळासाहेब कांचन, जनार्दन गोते, सारिका काळभोर, माया शितोळे, प्रकाश जगताप इ.उपस्थित होते. उपस्थित सभासदांचे आभार संस्थेचे उपाध्यक्ष रामदास चौधरी यांनी मांडले. अहवाल वाचन संस्थेचे मुख्यव्यवस्थापक लक्ष्मण वाल्हेकर यांनी केले.

शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याची मागणी

उरुळी कांचन

पूर्व हवेली तालुक्यातील परिसरात टिळेकरवाडी येथील निवृत्ती बाबुराव टिळेकर यांच्या शेतातील डाळिंब बागेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. तसेच या परिसरात असणाऱ्या अन्य शेतकऱ्यांच्या बागांना जोरदार पाऊसाचा तडाखा बसला.

उरुळी कांचन, वाडेबोल्हाई, अष्टापूर, भवरापूर, कोरेगावमुळ, पेठ, नायगाव, बिवरी, शिंदेवाडी, शिरसवडी, तरडे, सोरतापवाडी, शिंदवणे, वळती, न्हावी सांडस, सांगवी सांडस, पिंपरी सांडस, या भागात ही असणाऱ्या शेतकऱ्यांच्या पिकांची यामध्ये पालेभाज्या कोथिंबीर, मेथी, पालक, शापु, टोमॅटो, कांद्याची रोपे, मका, बाजरी पिकांना धोका निर्माण झाला आहे. सलग पावसामुळे खरीप हंगामातील पिके पाण्याखाली गेली. सलग पावसामुळे सर्व ओढे नाले फुल्ल भरुन वाहत आहे. शासनाने तातडीने पिकांची पाहणी करुन पंचनामे करुन नुकसान भरपाई तातडीने उपलब्ध करुन देण्याची मागणी टिळेकरवाडी (ता.हवेली) ग्रामपंचायत सदस्य तथा शेतकरी गणेश टिळेकर यांनी व्यक्त केली.

परतीच्या पावसाने पिकांचे मुळंच सडल्याने प्रचंड नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांंच्या हातातोंडाशी आलेला घास अस्माने संकटाने अक्षरशः ओढून नेल्याचे चित्र आहे. शेतमालाला बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. संबंधित कृषी विभागाने तातडीने पंचनामे करुन सर्व सामान्य शेतकऱ्यांना नुकसान भरपाई च्या माध्यमातून. दिलासा द्या अशी मागणी बिवरी गावचे माजी उपसरपंच तथा शेतकरी सुनिल गोते यांनी केली आहे.

गणेशोत्सवानिमित्त नारायणगाव परिसरात सार्वजनिक मंडळाचे आकर्षक देखावे

किरण वाजगे

नारायणगाव परिसरामध्ये गणेश उत्सवानिमित्त स्थानिक गणेश मंडळांनी विविध विषयांवर देखावे सादर केले आहेत. परंतु गेली चार दिवसांपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे गणेश मंडळांचा देखावा पाहण्यासाठी व सजावटीसाठी केलेला खर्च वाया गेला आहे. यामुळे एक प्रकारे गणेश भक्तांमध्ये विघ्न निर्माण झाले आहे.

नारायणगाव येथील प्रमुख मंडळांपैकी श्री गणेश गणेशोत्सव मंडळ वाजगेआळी, विरोबा मित्र मंडळ पाटेआळी, हनुमान चौक, श्रीराम चौक, काशीविश्वेश्वर मंडळ, श्री मुक्ताबाई मंडळ मावळे आळी व भाजी बाजार, महासुर्योदय मित्र मंडळ, शिव विहार गणेश मंडळ, तसेच खैरे मळ्यांमधील शिव झुंजार मित्र मंडळ, नवनाथ मित्र मंडळ, संत सावता महाराज मित्र मंडळ कोल्हे मळा, विटे को-हाळे मळा, श्री गणेश मंडळ शेटे मळा,औदुंबर मंडळ, नारायणवाडी मंडळ, वारूळवाडी येथील भागेश्वर मंडळ, शिवनेरी मित्र मंडळ साने वस्ती, नवशक्ती मंडळ, प्रगती मंडळ, चिमणवाडी गणेश मंडळ तसेच विविध मार्केट, सोसायट्यांमधील मंडळांच्या बाप्पांचे आकर्षक गणेश मूर्ती व देखावे पाहायला पावसामुळे व्यत्यय येत आहे.

दरम्यान नेहमी वेगळा व सुंदर देखावा करणारे नारायणगाव येथील शशी नेवकर यांनी आपल्या घरात नारायणगावचे ऐतिहासिक श्री शिवछत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार साकारले आहे.

तसेच निखिल घाडगे यांनी नारायणगावची श्री मुक्ताबाई देवीची यात्रा कुबेहूब साकारली आहे. श्री गणेशोत्सव मंडळ वाजगे आळी यांनी हृदयस्पर्शी देखावा सादर केला आहे, श्रीराम मंडळांने जय जवान जय किसान हा देखावा सादर केला आहे. विरोबा मित्र मंडळ पाटेआळी यांनी स्वच्छ मीनाई नदीचा देखावा सादर केला आहे. आदर्श मित्र मंडळाने मोबाईलच्या दुनियेत संस्कृतीचा ऱ्हास हा देखावा सादर केला आहे.

कनेरसर येथील जि.प.प्राथमिक शाळेत शिक्षक दिन साजरा

राजगुरूनगर

भारताचे माजी राष्ट्रपती डाॅ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांची जयंती व शिक्षक दिन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कनेरसर येथे साजरा करण्यात आला.

या वेळी कनेरसर केंद्राचे केंद्रप्रमुख आदरणीय श्री.बाळासाहेब गावडे साहेब, कनेरसर शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे, शाळेतील शिक्षिका श्रीम. अंजली शितोळे,श्रीम. सारिका राक्षे, श्रीम.शुभांगी जाधव मॅडम, कनेरसरचे सामाजिक कार्यकर्ते,शिक्षणप्रेमी पालक, श्री,.चंद्रकांत भाऊ दौंडकर, कनेरसरचे ग्रामस्थ शिक्षक श्री. संदिप म्हसुडगे उपस्थित होते.
प्रथम डाॅ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. शाळेच्या उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सारिका राक्षे मॅडम यांनी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन व शिक्षक दिन या विषयी माहिती सांगितली.

शिक्षक हे समाजविकासाचे केंद्रबिंदू आहे. समाज परिवर्तनाबरोबरच भविष्यातील विचारवंत, डाॅक्टर, प्राध्यापक, इंजिनीअर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते. मातीच्या गोळयाला योग्य आकार देवून कुंभार सुंदर कलाकृती तयार करतो. अगदी त्याप्रमाणेच शिक्षक बालकांच्या कोवळया मनावर योग्य संस्कार करून त्यातून भविष्यातील जबाबदार नागरीक घडवण्याचे काम शिक्षक करतात. असे श्री. चंद्रकांत भाऊ दौंडकर यांनी सांगितले.

आपल्या कनेरसर जि.प.प्राथमिक शाळेत असणारे सर्व शिक्षक उपक्रमशील असून अनेक उपक्रम राबवित आहेत. व शाळेची गुणवत्ता वाढीसाठी उत्तम प्रकारचे काम करत आहेत.सर्व शिक्षकांना प्रेरणा देण्यासाठी व त्यांच्या ऋणातून मुक्त होण्यासाठी शाळेतील शिक्षकांचा सन्मान .श्री. चंद्रकांत भाऊ दौंडकर व शिक्षक ग्रामस्थ श्री. संदिप म्हसुडगे यांच्या वतीने करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी शाळेचे मुख्याध्यापक श्री.नानाभाऊ गावडे सर यांनी आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.