जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पाऊस

किरण वाजगे,नारायणगाव

चिंचोली काशिद (ता.जुन्नर ) येथील वाजेवाडी शिवारात आठ साडेआठच्या सुमारास झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसामुळे वाजेवाडी बंधारा फुटला असून बंधाऱ्याचे व पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये तसेच गावात शिरल्यामुळे घरांचे तसेच पिकांचे देखील मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असल्याची घटना घडली आहे. अशी माहिती स्थानिक नागरिक व कुलस्वामिनी क्रेडिट सोसायटीचे वसुली अधिकारी अरुण काशीद यांनी दिली.

या पावसाचा जोर एवढा होता की केवळ अर्ध्या ते पाऊण तासांमध्ये बंधारा पूर्ण भरून व बंधारा फुटून पाणी घराघरात घुसले.त्याचप्रमाणे वडज भागात देखील पावसाच्या पाण्यामुळे शेतात पाणी घुसले आहे.

Previous articleजेष्ठ स्वयंसेवक पद्माकर गोपाळ वझे यांचे वृद्धापकाळाने निधन
Next articleपाटस येथील नागेश्वर विद्यालयातील (सन १९९५-९६) १० वीचे विद्यार्थी तब्बल २६ वर्षांनी पुन्हा आले एकत्र