अष्टापूर फाटा येथील तरुण मित्र मंडळ व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर

अमोल भोसले,उरुळी कांचन

पेरणे-वाडेबोल्हाई जि.प.गटामध्ये महाविकास आघाडीचे युवा सहकारी व पिंपरी-सांडसचे ग्रामस्थ तसेच आष्टापुर फाटा येथील तरुण मित्र मंडळाच्या वतीने व सेवा ब्लड बँक नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आष्टापुर फाटा येथिल शिवशंकर मंगल कार्यालय या ठिकाणी ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

आष्टापुर फाटा येथे शिवशंकर मंगल कार्यालय या ठिकाणी शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व महाराट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटनीस प्रदीप कंद यांच्या सहकार्यातुन रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. महाराष्ट्र राज्यामध्ये, पुणे शहर व ग्रामीण भागातील कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर व कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन सामाजिक बांधिलकी मानत सामाजिक जबाबदारीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबीरामध्ये एकुण ११८ रक्तदात्यांनी रक्तदान केले.

यावेळी प्रदिप कंद यांनी सांगितले की सद्याच्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रभावामुळे राज्या मध्ये रक्ताची कमतरता निर्माण झाली यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार , मुखमंत्री उद्धवजी ठाकरे व उपमुखमंत्री अजित पवार यांनी आवाहन केले होते आणि याच आवाहनाला प्रतिसाद देत माझ्या काही युवक सहकार्यांनी कर्तव्य भावनेने रक्तदान शिबिर आयोजित केले.पुढील काळामध्ये आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आपण सगळे आपल्या जि.प. गटामध्ये करोना योद्धे बनुन काम करु व संकटकाळी सर्वसामान्यांसाठी ऊभे राहु असे आव्हान केले.

या वेळी हवेली तालुका राष्ट्रवादी युवक कॉग्रेस अध्यक्ष योगेश शितोळे, विजय वाळुंज तसेच आयोजक असलेले दादा सुरेश भोरडे, महेश भोरडे, वैभव भोरडे ,चेतन आनंद ,अविनाश आनंद, प्रज्वल भोरडे, या सहकर्यांची हितगुज प्रदेश सरचिटणीस प्रदिप वसंत कंद केली. या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमास परिसरातील अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous articleमास्क व सॅनिटायझर वाटप करून वाढदिवस साजरा
Next articleसोरतापवाडी- पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या लसीकरण उपकेंद्रास सॅनिटायझर कॅन भेट