मास्क व सॅनिटायझर वाटप करून वाढदिवस साजरा

चाकण- खेड तालुक्यातील काळुस येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष खैरे यांनी आपला वाढदिवस साजरा न करता सद्य परिस्थितीचे भान ठेवून सगळीकडे कोरोनाची लाट पसरली असल्याने आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना उराशी बाळगून आपल्या वाढदिवसाच्या दिवशी केक, सजावट व इतर खर्च न करता वाढदिवसाच्या निमित्ताने गावात आगळावेगळा उपक्रम राबवला.


सध्या संपूर्ण जगावर कोरोना या विषाणूजन्य आजाराने थैमान घातले असताना सर्वच ठिकाणी आर्थिक व्यवस्था कोलमडली आहे तरी देखील समाजाचे आपण काहीतरी देने आहे या भावनेतून वाढदिवसाच्या निमित्ताने होणारा अनाठायी खर्च टाळून वाढदिवसाच्या निमित्ताने युवाउद्योजक संतोष खैरे यांनी केले गावामध्ये मास्क व सॅनेटायझरचे वाटप केला

आज सोमवार दिनांक १० मे रोजी संतोष खैरे यांचा वाढदिवस आहे. कोरोना च्या पार्श्वभूमीवर त्यांनी वाढदिवस साजरा न करता सामाजिक अंतर राखत व लॉकडाऊनच्या नियमावलीचे पालन करत गावातील ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझरचे मोफत वाटप करुन जमलेल्या ग्रामस्थांना कोरोनापासून बचाव करण्यासाठी काय काळजी घ्यावी याविषयी सविस्तर माहिती देऊन जनजागृती केली. संतोष खैरे यांच्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर वाढदिवसाच्या निमित्ताने सोशल मीडिया द्वारे शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Previous articleपत्नीसह एका वर्षाच्या मुलाची हत्या, पतीची गळफास घेऊन आत्महत्या
Next articleअष्टापूर फाटा येथील तरुण मित्र मंडळ व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर