सोरतापवाडी- पुरोगामी माध्यमिक विद्यालयाच्या लसीकरण उपकेंद्रास सॅनिटायझर कॅन भेट

अमोल भोसले,उरुळी कांचन

पूर्व हवेली कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी नागरिकांनी मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन केल्यास कोरोनाचा प्रसार आपोआपच कमी होईल. तसेच नागरिकांनी घरी राहा, सुरक्षित राहा, आणि आपली व आपल्या कुटुबाची काळजी घ्या असे आवाहन सरपंच सुरज चौधरी यांनी केले.

पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने कोरोनाची लसिकारणाचा वेग वाढविला आहे. यासाठी जिल्हा आयोग्य विभागाने प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करोना उपकेंद्रे तयार केली आहेत. कुंजीरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत कोरोनाच्या लसीकरणासाठी सोरतापवाडी येथील पुरोगामी माध्यमिक विद्यालयात उपकेंद्र तयार करण्यात आले आहे. या उपकेंद्रांतर्गत नायगाव, पेठ आणि प्रयागाधाम ही गावे येतात.

पुरोगामी माध्यमिक विद्यालय सोरतापवाडी (ता. हवेली’) येथील कोरोना लसीकरणाच्या उपकेंद्रास पेठचे सरपंच सुरज चौधरी यांच्या हस्ते मुख्याध्यापक सुनील पडवळ यांनी सॅनिटायझरचे कॅन देण्यात आले.

सोरतापवाडी उपकेंद्रावर कोरोना लसीकरणासाठी नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. नागरिकांच्या सुरक्षितेसाठी व कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी सरपंच सुरज चौधरी यांनी पुरोगामी माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सुनील पडवळ यांना सॅनिटायझरचे दोन कॅन देऊन खारीचा वाटा उचलला आहे.

यावेळी पेठचे पोलीस पाटील दत्ताञय चौधरी, राजेश चौधरी, तुळशीराम चौधरी आणि अनिल ढवळे आदी उपस्थित होते.

दरम्यान, प्रशासनाच्या वतीने नागरिकांना कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतीबंधानात्मक उपाययोजना सुरु केल्या आहेत. परंतु, अजूनही नागरिक मास्क, सॅनिटायझर आणि सोशल डिस्टंसिंग या नियमांचे पालन करताना आढळून येत नाही. पोलीस प्रशासन व ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने दुकानदार, भाजीपाला विक्रेते, वाहन चालक आणि विनाकारण रस्त्यावरून फिरणारे नागरिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करीत आहे. परंतु, नागरिकांना कोरोनाचे कसल्याही प्रकारचे गांभीर्य नसल्याचे चित्र समोर येत आहे.

Previous articleअष्टापूर फाटा येथील तरुण मित्र मंडळ व सेवा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर
Next articleसाहित्यिक व कलावंत मानधन जिल्हास्तरीय समितीच्या सदस्यपदी हभप.आनंद तांबे महाराज