न्यायालयीन बंदी झुगारून बैलगाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल

राजगुरुनगर: तिन्हेवाडी (ता.खेड) येथे न्यायालयीन बंदी झुगारून घाटात बैलगाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अरूण राघू थिगळे , निलेश चंद्रकांत पाठरे , धोंडीभाऊ बबन आरूडे ,संतोष शिवाजी आरुडे, नानाभाऊ सहादु आरुडे ( सर्व रा. तिन्हेवाडी ता. खेड ) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

खेड तालुक्यातील तिन्हेवाडी येथे रविवारी (दि. २२ ) न्यायालनाने घातलेली बैलगाडा शर्यतीवरील बंदी झुगारुन बैलगाडे सकाळी सात वाजल्यापासुन पळविण्यात येत होते.या शर्यती पाहण्यासाठी बैलगाडा मालक आणि शौकीनांनी घाटात मोठी गर्दी केली होती. मात्र याची कुणकुण लागताच खेड पोलिसांनी घाटात जाऊन शर्य़ती सुरु असलेल्या बंद केल्या. प्राण्यांना निर्दयीपणे वागवुन कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन व्यवस्थापन नियमांचे उल्लघन करून बैलगाडा घाटात गर्दी जमविल्याबद्दल संबधितावर गुन्हा दाखल केला आहे.याबाबत पोलीस कॉन्स्टेबल शेखर चिमणा भोईर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Previous articleघोडेगाव:-आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा-आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे या़ंचे आवाहन
Next articleशिक्षक पदवीधर आमदार निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी