घोडेगाव:-आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा-आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे या़ंचे आवाहन

सिताराम काळे, घोडेगाव

ताप येणे, खोकला येणे, घसा दुखणे, अंगदुखी, सर्दी, डोकेदुखी, वाहते नाक, श्वास घेण्यास त्रास होणे, अतिसार व उलटया होणे, ताप येवुन तीन दिवस न उतरने व शुध्द हरपणे, धाप लागणे आदि स्वाईन फ्ल्यूची व डेंग्युची लक्षणे आढळल्यास दवाखान्यात जावे, अन् आठवडयातील एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा, असे आवाहन आंबेगाव तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे यांनी केले.

घरातील फुलदाणी, कुंडया, फ्रिजच्या खालील ट्रे, एअर-कंडिशनर तसेच उघडयावरील टायर, फुटके डबे, कौले, करवंटया, घरातील पाणी साठवणूकीचे पिंपे आदिंमध्ये पाणी साठल्यास तिथे डासाची काळी अंडी तयार होते व त्यानंतर त्याचे अळी, लारवा, कोष ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डेंग्युचे डास होतात. या डासांचे आयुष्य हे सात दिवसांचे आहे. डेंग्यु व चिकुनगुनीयाचा डास हा दिवसा चावतो, तर मलेरिया हा डास गढुळ पाणी, ड्रेनेज, सारख्या ठिकाणी तयार होतो. याबाबत घोडेगाव गावठाण व परीसरामध्ये किटक शास्त्रीय सव्हेक्षण तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश ढेकळे, एस.एल.गवारी, डी.बी.जाधव यांचे मार्गदर्शनाखाली एम.एस.हुले, एन.आर.मराडे, दत्ता शेलार, बी.एम.शेलार, पी.व्ही. गवंडी, बी. टी.साबळे, डी.एम.भागवत हे पथक प्रत्येक घरी, उघडयावर असणा-या टाक्या, उघडी गटारे आदिंची तपासणी व जनजागृती करण्याचे काम करत आहे.

Previous articleघोडेगाव मध्ये डेंग्यू रूग्णांची वाढती संख्या धोकादायक
Next articleन्यायालयीन बंदी झुगारून बैलगाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल