शिक्षक पदवीधर आमदार निवडणूक पुढे ढकलण्याची राज्य निवडणूक आयोगाकडे मागणी

पुणे-नुकत्याच झालेल्या दिवाळी सणामुळे मिशन बिगेन अंतर्गत महाराष्ट्र शासनाने नागरिकांना कोरोनामुळे महाराष्ट्रात लागू केलेल्या प्रतिबंधात्मक कायदा यातून दिलेली सूट यामुळे नागरिकांना घालून दिलेले नियम यांचे उल्लंघन करत मोठ्या प्रमाणात गर्दी केली.

यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊन महाराष्ट्रात पुन्हा कोरोना रुग्णसंख्या वाढू लागल्याने महाराष्ट्र शासनाने DMU/2020/CR.92/DISM-1,दिनांक 23/11/2020 च्या आदेशाने पुन्हा प्रतिबंधक कायद्याप्रमाणे नागरिकांवर बंधने लादण्यात आलेली आहेत.जर नागरिकांनी गर्दी केल्याकारणाने व नियमांचे उल्लंघन झाल्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत शिक्षक पदवीधर आमदार निवडणुकीमुळे व उमेदवारांच्या प्रचार सभांमुळे मोठ्या प्रमाणात शिक्षक पदवीधर मतदारांची गर्दी व सभा होत आहेत.

या प्रचारसभांच्या गर्दीमुळे व नियमांचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन होत आहे.त्यातच नव्याने शाळा सुरू होत आहेत यात शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करण्याच्या अटींनुसार मोठ्या प्रमाणात शिक्षक कोरोना पोझिटिव्ह असल्याचे अहवाल आलेले आहेत.याचे कारण शिक्षक पदवीधर आमदार निवडणुकांच्या प्रचारसभांना शिक्षकांची उपस्थिती हेही आहे.यामुळे सध्या महाराष्ट्रातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता डिसेंबर महिन्यात मतदानाची तारीख पुढे ढकलण्यात यावी व शिक्षक पदवीधर आमदार निवडणूक प्रचार सभांवरती निर्बंध घालण्यात यावेत . अशी मागणी मानवी हक्क संरक्षण व जागृती संस्थेचे अध्यक्ष विकास कुचेकर, आकाश भोसले (पत्रकार), पिंपरी चिंचवड शहर अध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग, मा.राज्यपाल महाराष्ट्र राज्य. मा.मुख्यमंत्री , मा.पुणे जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Previous articleन्यायालयीन बंदी झुगारून बैलगाडा शर्यती भरविल्याप्रकरणी खेड पोलिस ठाण्यात पाच जणांवर गुन्हा दाखल
Next articleभुजबळ परिवारांचा सामाजिक वारसा उल्लेखनीय – आमदार अतुल बेनके