नायगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा

उरुळी कांचन

महाराष्ट्र शासन कृषी विभाग मार्फत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बोटे, उप विभागीय कृषी अधिकारी नरहे, तालुका कृषी अधिकारी साळे यांच्या मार्गदर्शना मध्ये नायगाव येथे कृषी संजीवनी सप्ताह साजरा झाला. यावेळी कृषी पर्यवेक्षक रामदास डावखर शासनाच्या विविध योजना व डीबिटी पोर्टल द्वारे लाभ घेण्याची पद्धत व त्याचे विविध टप्पे समजावून सांगताना शेतकऱ्यांचे विविध प्रश्नांचे शंका निरसन केले. कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजना अंतर्गत गांडूळ खत, नाडेप खत, विहित पुनर्भरण, सलग व बांधावर फळबाग लागवड योजना बद्दल माहिती दिली. कृषी सहाय्यक महेश महाडिक यांनी बाजरी व ऊस बीजप्रक्रिया बद्दल माहिती दिली.

मा.प्र.सरपंच राजेंद्र रतन चौधरी यांनी शेतीशी निगडित बँक कर्ज संलग्न अनुदान योजना बद्दल माहिती देऊन त्यात सहभागी होऊन आर्थिक उन्नती साधण्याचे आवाहन केले. यावेळी आत्मा योजणे अंतर्गत परस बागेमध्ये सेंद्रिय पद्धतीने विषमुक्त भाजीपाला उत्पादनासाठी बियाणे किट वाटप करण्यात आले तसेच जिवाणू कल्चर चे देखील वाटप करण्यात आले.

यावेळी प्रगतिशील शेतकरी व कृषी मित्र चंद्रकांत हिरामण चौधरी, शरद चौधरी, विकास चौधरी, सुहास चौधरी, निलेश चौधरी, समीर चौधरी, सागर चौधरी, चंद्रकांत रांनबा चौधरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे नियोजन व आभार प्रदर्शन कृषी सहाय्यक महेश सुरडकर यांनी केले.

Previous articleप्रत्येक राज्यात लोकपाल कार्यालय सुरु करावीत,तसेचं लोकायुक्तांची तातडीने नेमणूक व्हावी – जेष्ठ समाजसेवक आण्णा हजारे
Next articleरोटरी क्लबच्या वतीने सोरतापवाडी येथील पुरोगामी विद्यालयाला डिजिटल क्लासरूमची व्यवस्था