खालुम्ब्रे येथील ह्युंदाई कंपनी ते ह्युंदाई चौक रस्त्याच्या नूतनीकरणाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन

चाकण- खालुम्ब्रे (ता. खेड) येथील ह्युंदाई कंपनी ते ह्युंदाई चौक या रस्त्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन समारंभ ह्युंदाई चौक खालुंब्रे येथे पार पडला. या रस्त्याच्या नुतनीकरणासाठी चाळीस लाखांची मंजुरी गणेश बोत्रे यांच्या पुढाकाराने आणि आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या मदतीने औद्योगिक विकास महामंडळ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत देण्यात आली.

 चाकण-तळेगाव महामार्ग म्हटले की वाहतूक कोंडी हा शब्द जोडूनच येतो. अरुंद महामार्ग आणि त्यामध्ये चाकण औद्योगिक वसाहती चा भाग, अवजड वाहनांची वर्दळ, कामगारांच्या बसची गर्दी या सर्व गोष्टींमुळे खालुंब्रे ते चाकण एमआयडीसीत वाहतूक कोंडी नित्याचीच झाली आहे. औद्योगिक वसाहतीतील कंपन्या सुटतेवेळी ह्युंडाई कंपनीकडून चाकण रस्त्यावर येणाऱ्या वाहनांमुळे तळेगावकडून चाकणकडे जाणारी रहदारी ठप्प होते. खालुम्ब्रे ते हुंडाई कडे जाणारा रस्ता खराब असल्यामुळे वाहनांची गती मंदावते त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडीत भर पडते त्यामुळे खालुंब्रेत नेहमी वाहतुक कोंडी होते. याचा त्रास प्रवाशांबरोबर स्थानिकांनाच जास्त होतो. रस्त्याच्या नुतनीकरणानंतर कोंडी निश्चितच कमी होण्यास मदत होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.या कार्यक्रमाचे उदघाटन आमदार दिलीपराव मोहिते पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

या वेळी खालुंब्रे गावचे विद्यमान सरपंच सोनल बोत्रे, उपसरपंच सुनीता पोपट पवार, शोभा संजय गाडे,  रामभाऊ मोरे, भास्कर तुळवे, बाबाबी बोत्रे, कांताराम बोत्रे,  कैलास बोत्रे, अनिल बोत्रे, मनोज बोत्रे, दिलीप बोत्रे, संदीप बोत्रे, लखन भाऊ पवार, संजय भाऊ बोत्रे, विशाल तुळवे, दशरथ बोत्रे, सुधिर गाडे, किरण गाडे, नितीन गाडे , नितीन बोत्रे, किरण गाडे , ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleकवठे येमाई विविध कार्यकारी सोसायटीवर भगवा फडकला
Next articleन्हावेड येथील भैरवनाथ टेनिस क्रिकेट स्पर्धेत लायन हार्टेड प्रथम