न्हावेड येथील भैरवनाथ टेनिस क्रिकेट स्पर्धेत लायन हार्टेड प्रथम

घोडेगाव

स्वर्गीय सुधीरभाऊ वडेकर यांच्या स्मरणार्थ आयोजित भैरवनाथ चषक न्हावेड आंबेगाव तालुक्यात पश्चिम भागात न्हावेड या गावात या भव्य फुलपिच टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

प्रथम् क्रमांक:- 41,000 रुपये
व्दितीय क्रमांक:- 31,000 रुपये
तृतीय क्रमांक:-21,000 रुपये
चतुर्थ क्रमांक:-11,000 रुपये

या स्पर्धेचे वैशिट्य म्हणजे कोव्हीड चे सर्व नियम पाळून, एक उत्कृष्ट आयोजन आणि नियोजन म्हणजे न्हावेड चषक ही स्पर्धा 25/02/2022 ते 1/02/2022 या कालावधीत पार पडली.

या स्पर्धेमध्ये रायगड जिल्हा, नगर जिल्हा आणि पुणे जिल्ह्यातून एकुन ४० संघानी आपला सहभाग नोंदवून आपल्या उत्कृष्ट खेळीने खेळाडूंने प्रक्षेकांची मने जिकंली.

१) प्रथम् क्रमांक:- लायन हार्टेड ११ जांभोरी या संघाने 41 हजार रूपये व भव्य चषक मिळवून प्रथम क्रमांक पटकविला. या संघाचे संघ मालक मनोहर केंगले गुरूजी, सुरज प्रकाशराव घोलप याचे सहकार्ये मोलाचे राहिले.

सर्वोत्कृष्ट खेळ करुन स्पर्धेतील मॅन ऑफ दि सिरीज चा मानकरी
दत्ता गिरंगे, मॅन ऑफ दि मॅच बबन केंगले

जांभोरी गावचे पोलीस पाटील श्री. नवनाथ दत्तात्रय केंगले, सरपंच विलास केंगले, मनोहर केंगले गुरुजी,मारुतीदादा केंगले युवानेते हे मान्यवर उपस्थित होते*

Previous articleखालुम्ब्रे येथील ह्युंदाई कंपनी ते ह्युंदाई चौक रस्त्याच्या नूतनीकरणाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
Next articleआहुपे येथील भैरवनाथ क्रिकेट क्लब ने पटकाविला आदीवासी चषक