कवठे येमाई विविध कार्यकारी सोसायटीवर भगवा फडकला

धनंजय साळवे

कवठे यमाई – येथील कवठे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या निवडणुकीमध्ये शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलने बाजी मारली .अतिशय चुरशीच्या उत्कंठावर्धक लढतीत जगदंबा सहकार पॕनलने बाजी मारली.या पॕनलचे आठ उमेदवार निवडुन आले व राष्टवादी पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलचे पाच उमेदवार निवडुन आले .या विजयामुळे शिवसेने च्या गोटात आनंदाचे वातावरण तयार झाले.विजयी उमेदवारांची घोषणा जाहीर होताच शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.विजयी उमेदवारांची मिरवणुक काढुन गुलाल व फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली.

या पॕनलची मुख्य धुरा पं.समिती सदस्य डाॕ.सुभाष पोकळे ,सरपंच रामदासशेठ सांडभोर,मा.सरपंच बबनराव पोकळे,उपसरपंच विठ्ठलशेठ मुंजाळ यांसह असंख्य  शिवसेना कार्यकर्त्यांवर होती.दोन्ही पक्षाकडुन निवडणुक हि अत्यंत प्रतिष्ठेची करण्यात आली होती.गावातील मुंजाळवाडीची सत्ता राष्ट्रवादी कडे गेल्यामुळे कार्यकर्त्यांनी जोमाने काम करुन विजयश्री खेचुन आणली.

डाॕ.पोकळेंनी ह्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करताना हा विजय कार्यकर्त्यांचा असल्याचा सांगितले . कार्यकर्त्यांनी निष्टेने व एकदिलाने कामकेल्यामुळेच हा विजय झालाअसल्याचा सांगितले. सर्व कार्यकर्ते व मतदारांचे त्यांनी आभार मानले.

 

शिवसेना पुरस्कृत जगदंबा सहकार पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – १) श्री.विक्रम मळीभाऊ ईचके २)श्री.पडवळ दत्तात्रय गोविंद ३) श्री.मुखेकर हौशीराम धोंडीबा ४) श्री .शहा रितेश शशीकांत ५)श्री . सांडभोर एकनाथ बाबुराव ६)श्री.वागदरे बबन गंगाराम ७) सौ.ईचके विजया बाळासाहेब ८) श्री.पोकळे  बबनराव मारूती राष्ट्रवादी पुरस्कृत जगदंबा सहकार परीवर्तन पॕनलचे विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे – १)श्री.बच्चे कैलास रामदास २)श्री.उघडे बाजीराव लक्ष्मण ३)श्री.गायकवाड भरत मारुती ४) सौ.ईचके लीलाबाई बबन ५)श्री.ईचके प्रकाश गणाजी

 

Previous articleयेरवडा जेलमधून फरार झालेल्या आरोपीला दौंड पोलिसांनी केले जेरबंद
Next articleखालुम्ब्रे येथील ह्युंदाई कंपनी ते ह्युंदाई चौक रस्त्याच्या नूतनीकरणाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन