देऊळगाव राजे येथे कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत जनजागृती

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे कृषि विभागाच्या वतीने कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत जनजागृती करण्यात आली, या कार्यक्रमास परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

मंडल कृषि अधिकारी दिनेश फडतरे यांनी कृषि संजीवनी साप्ताहाची गरज व एम.आर.इ.जी.एस फळलागवड याविषयी मार्गदर्शन केले, कृषि सहाय्यक शरद काळे यांनी महाडीबीटी पोर्टल विषयी माहिती देताना अर्ज भरत असताना कोणती काळजी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले,कृषी पर्यवेक्षक संतोष मोरे यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान याविषयी मार्गदर्शन केले, यावेळी तुळशीदास बुऱ्हाडे यांच्या आंब्याच्या बागेला भेट देण्यात आली.

यावेळी देऊळगाव राजे ग्रामपंचायत चे उपसरपंच बाबू पासलकर,पत्रकार आप्पासाहेब खेडकर,प्रशांत वाबळे, भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे तालुकाध्यक्ष अभिमन्यू गिरमकर, रामचंद्र दूधाट,तुळशीदास बुऱ्हाडे, अंबरनाथ भोसले,कृषी पर्यवेक्षक आर.व्ही जाधव,प्रभाकर बोरावडे,रवींद्र तापकीरे,राजेंद्र जगदाळे, राजेंद्र जांभळे,वैभव भांडारी,ज्योती भोसले,शीतल मगर,तेजश्री ढवळे व ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleगोपाळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग निर्वाह निधीचे वाटप
Next articleकोविड मुक्त वेगरे सारख्या दुर्गम गावातील ग्रामस्थांचे मोफत लसीकरण