गोपाळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत अपंग निर्वाह निधीचे वाटप

दिनेश पवार,दौंड

गोपाळवाडी ग्रामपंचायत अंतर्गत 5% टक्के निधीतून अपंग निर्वाह निधीच्या धनादेशाचे वाटप जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांच्या हस्ते करण्यात आले तसेच गोपाळवाडी येथील आरोग्य उपकेंद्रास भेट देऊन लसीकरणाबाबत जगदाळे यांनी आढावा घेतला व येथील विरंगुळा केंद्राच्या कामाची पाहणी केली.

यावेळी सरपंच लक्ष्मीताई होले, उपसरपंच सूरज भुजबळ, जयसिंग दरेकर, नारप्पा सुळ,मयूर शिंदे,किशोर टेकवडे,ग्रामसेवक गोळे भाऊसाहेब तसेच ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleहिंगणीबेर्डी येथे विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न
Next articleदेऊळगाव राजे येथे कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत जनजागृती