Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड
पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने हिंगणीबेर्डी येथील विविध विकासकामांचे उदघाटन व भूमिपूजन माजी आमदार रमेश थोरात यांच्या हस्ते संपन्न झाले.
पूर्वभागातील मूलभूत विकासकामे जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे यांनी विशेष प्रयत्न करून सुरू ठेवल्याने सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सुटण्यास मदत होत असल्याचे मत रमेश थोरात यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्य वीरधवल जगदाळे तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी दौंड तालुका अध्यक्ष आप्पासाहेब पवार, मा.नगरसेवक,प्रवीण भैय्या परदेशी, मा.सभापती ताराबाई देवकाते, डॉ.संभाजी यादव,सरपंच मनीषा यादव, उपसरपंच शीतल भोसले,ग्रामसेवक भाऊसाहेब निगडे,श्रीराम यादव,व ग्रामस्थ उपस्थित होते.
काळेवाडी येथे बॉडिझोन हेल्थक्लब, जोतीबानगर येथील रस्त्याचे काँक्रीटीकरण, मुगाव येथील शुद्धपाणी पुरवठा योजना,काळेवाडी येथे वृक्षारोपण अशी विविध कामे करण्यात आली,या कार्यक्रमाचे प्रस्ताविक परमेश्वर गायकवाड यांनी केले तर सूत्रसंचालन सहदेव काळे यांनी केले
Download WordPress Themes Nulled and plugins.