Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड
आलेगाव (कदमवस्ती) येथे आयोजित आर.टी.पी.सी.आर या घशातील कोरोना चाचणी शिबिरास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला . या शिबिरात 433 नागरिकांनी चाचणी केली,पडत्या पावसात देखील चाचणी साठी नागरिक उपस्थित होते. आयोजकांनी घरोघरी जावून जनजागृती करून नागरिकांना चाचणी करण्यासाठी प्रोत्साहन दिले,कोरोना विषयक आवश्यक ती खबरदारी घेऊन नागरिकांनी या शिबिरास प्रतिसाद दिला.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुरेखा पोळ,देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ.सुमित सांगळे,बोरिबेल उपकेंद्राचे डॉ. अजय पोतन यांच्या प्रयत्नातून हे शिबिर घेण्यात आले.हे शिबीर यशस्वी करण्यासाठी पोलीस पाटील योगेश बोबडे ,मा.चेअरमन नाथाभाऊ कदम,मा.सरपंच हेमंत कदम,अजित कदम,सचिन इंगवले,दिपक इंगवले,लॅब टेक्निशियन ओंकार वाघ यांचे विशेष सहकार्य लाभले.
Download WordPress Themes Nulled and plugins.