कोविड मुक्त वेगरे सारख्या दुर्गम गावातील ग्रामस्थांचे मोफत लसीकरण

पौंड- वेगरे (ता.मुळशी) येथील ग्रामस्थांना शासनाच्या वतीने मुठा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून कोविड – 19 प्रतिबंधात्मक लसीचा अनुक्रमे पहिला व दुसरा डोस मोफत देण्यात आला. मुठा खोर्‍यातील वेगरे हे मुठा नदी उगमस्थानाजवळचे शेवटचे गाव गावापासून प्राथमिक आरोग्य केंद्र 30 किलोमीटरवर येण्या-जाण्यासाठी वाहनाची सोय नाही तसेच येथील काही घरेही डोंगरावर असल्यामुळे येथील ग्रामस्थांना मुख्य रस्त्यावर येण्यासाठी अनेक किलोमीटर चालत यावे लागते तसेच सध्या या परिसरात पावसाचा जोरही वाढला असून ग्रामस्थांची शेतीची कामे देखील चालू आहेत व दवाखान्यात जाऊन लस घ्यावी अशी अजून तरी ग्रामस्थांची मानसिकता तयार झाली नाही आणि गाव 100% कोरोना मुक्तच रहावे व तिसऱ्या लाटेने गावात शिरकाव करू नये याची खबरदारी म्हणून सर्वांचे लसीकरण होणे अत्यंत गरजेचे आहे. यासाठी 18 वर्षावरील सर्वांचे गावातच लसीकरण व्हावे अशी मागणी वेगरेचे माजी सरपंच भाऊसाहेब मरगळे व पोलीस पाटील यमुना भाऊ मरगळे यांनी आरोग्य विभागाकडे करून त्याचा वारंवार पाठपुरावा देखील केला होता. त्यानुसार मुठा आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रामदास ताठे यांच्या मार्गदर्शनाखालील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पथकाने दुर्गम डोंगरी भागातील कच्च्या रस्त्यावर मात करीत गावात जाऊन सार्वजनिक ठिकाणी तर वयोवृद्धांना घरी जाऊन पहिल्या व दुसऱ्या डोसचे लसीकरण केले.


या आरोग्य पथकात डॉक्टर फातिमा पठाण ,डॉक्टर कार्तिकी रासकर, आरोग्य कर्मचारी विशाल पवार, मनोज मखरे, माधुरी दुधाने सिस्टर , भागीरथी पवार, दिनेश पंचवाघ, गणेश आग्नेन, आशा कार्यकर्त्या अर्चना चवले, वाहन चालक रवी तारू यांचा सहभाग होता. यावेळी 60 नागरिकांचे कोविशील्ड या लसीने लसीकरण करण्यात आले. लस घेण्याबाबत ग्रामस्थांमध्ये असणारा संभ्रम समज-गैरसमज लस घेण्याचे फायदे याबाबत इंजिनीयर मंगल मरगळे यांनी ग्रामस्थांना प्रबोधन केले.

सदर लसीकरणाबाबत जनजागृती ग्रामपंचायतीच्या वतीने केली होती तर उर्वरित राहिलेल्या नागरिकांचे देखील लसीकरण पुढील टप्प्यात लवकरच केले जाईल असे सरपंच मिंनाथ कानगुडे यांनी सांगितले.

यावेळी राजेंद्र गुंड ,रामचंद्र मरगळे, रामभाऊ कोकरे, शत्रुघ्न कानगुडे, जगन्नाथ कोकरे, नवनाथ कानगुडे, सदाशिव गुजर, बाबू मरगळे, अमोल गुंड, कीर्तनकार दत्ता दोन्हे, संतोष दोन्हे,सुनील कात्रट, विठू मरगळे, लक्ष्मण बावधने, इत्यादी व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleदेऊळगाव राजे येथे कृषि संजीवनी मोहिमेअंतर्गत जनजागृती
Next articleवृक्षारोपण निसर्गाचीच नव्हे तर समाजाची गरज- सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे शहर कल्याणराव विधाते