रोग्याला योगी बनविण्यासाठी नित्यनेमाने योगा करणे महत्वपूर्ण- जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

आरोग्य ही सर्वात मोठी भेटवस्तू आहे. संतोष  ही सर्वात मोठी संपत्ती आहे. हे केवळ योगामुळेच मिळते. मनशक्ती आणि शरीराला सकारात्मक उर्जा मिळवण्याचे तंत्र म्हणजे योगा. योग हे शास्त्र आहे. शरीर, मन आणि आत्मा यांचे एकत्रितरित्या संतुलन घडविण्याचे, निरोगी आणि प्रसन्न ठेवण्याचे काम योगाने घडते असे मत उरुळी कांचन (ता.हवेली) येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. रवींद्र भोळे यांनी जागतिक योग दिनाच्या निमित्ताने व्यक्त केले.

योगमुळे शरीर आंतर-बाह्य निरोगी ,शुध्द होउन शरीरातील जुनाट आजार मुक्त होऊन अंतरीक चेतना शक्तिला प्रेरणा मिळते. यम, नियम, आसन, प्रत्यहार, प्राणायाम, धारणा, ध्यान व समाधी ह्या असटांगयोग साधनेसाठी ऋषि मुनिनी योगोपचार केला, योगोपचार आत्यंत महत्त्वपुर्ण असल्याचे मत मत डॉ मणीभाई देसाई मानवसेवा ट्रस्ट (आय एस ओ नामांकीत )निती आयोग ,युवा कल्याण मंत्रालय एन वाय के दिल्ली यांनी आवाज जनतेच्या प्रतिनिधीशी बोलताना  व्यक्त केले.

Previous articleअज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू
Next articleनवनाथ वायकर यांच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा कवचच्या रुपाने मदत-आमदार अशोक पवार