नवनाथ वायकर यांच्या माध्यमातून अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना सुरक्षा कवचच्या रुपाने मदत-आमदार अशोक पवार

अमोल भोसले,उरुळी कांचन

पिंपरी सांडस (ता.हवेली) येथील युवा नेते तसेच अग्निशमन दलाचे अधिकारी नवनाथ भगवान वायकर यांच्या माध्यमातून त्यांच्या वडिलांच्या स्व.भगवान ज्ञानोबा वायकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी पिंपरी सांडस येथील पंधराशे शेतकऱ्यांचा सुमारे पंधरा कोटी रुपयाचा अपघाती विमा काढला त्याचे वितरण शिरूर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

आमदार अशोक पवार म्हणाले नवनाथ वायकर या युवकाचे मनापासून अभिनंदन केले की अडचणीच्या काळामध्ये आपण शेतकऱ्यांना अशी सुरक्षा कवच देऊन सन्मानित केले तसेच शिरूर-हवेलीच्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. संजय गांधी निराधार योजनेचा सर्वाधिक निधी हा आपल्या शिरूर-हवेली मतदार संघामध्ये आला पाहिजे व त्याचा फायदा सर्वसामान्य लाभार्थ्यांना झाला पाहिजे अशा सूचना अध्यक्ष व कमिटीला दिल्या.

यावेळी हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष दिलीप वाल्हेकर, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विकास लवांडे, महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक सरचिटणीस प्रदीप कंद, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष माऊली थेऊरकर, संजय गांधी निराधार योजनेचे हवेली तालुका अध्यक्ष योगेश शितोळे, सरपंच राजुअण्णा भोरडे, दिपकराव भोरडे, हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संजय मांडे, साईनाथ वाळके, मा.उपसरपंच विकास जमादार, उद्योजक राजेंद्र वारघडे, मा.सरपंच राजेंद्र भोरडे, बजरंग चितळकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजक नवनाथ वायकर यांनी कार्यक्रमाचा उद्देश पार्श्वभूमीवर थोडक्यात प्रास्ताविक मध्ये सांगितली.

Previous articleरोग्याला योगी बनविण्यासाठी नित्यनेमाने योगा करणे महत्वपूर्ण- जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे
Next articleबारामती इको सिस्टिम्स् प्रा.लि. कंपनीचा “बायोगॅस”संयत्र ऊत्पादन क्षेत्रामध्ये मध्ये कार्यरत-अभिमन्यु नागवडे