अज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू

नारायणगाव ( किरण वाजगे)

आंबेगाव तालुक्यातील मंचर व जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील पुणे नाशिक महामार्गावरील सीमेवर रविवार (दि २०) रोजी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास २ वर्ष वयाचा नर बिबट्या अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे जागीच मृत्युमुखी पडला. दरम्यान या बिबट्या सोबत अजून एक बिबट्या होता अशी माहिती प्रत्यक्षदर्शी ग्रामस्थांनी दिली.

मागील दीड ते दोन वर्षात पुणे-नाशिक महामार्गावर अवघ्या सहा ते सात किलोमीटरच्या अंतरामध्ये अज्ञात वाहनाने धडक दिल्याने ५ बिबट्यांचा मृत्यू झाला असून रानससे, तरस, रानमांजरे, कोल्हे, लांडगे असे अनेक वन्य प्राणी अज्ञात वाहनांच्या धडकेने मृत्युमुखी पडले आहेत.

दरम्यान या घटनेची माहिती समजताच उपवन संरक्षक जयरामे गौडा, वनक्षेत्रपाल अजित शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपाल नारायण आरोडे, वेलकर, वनरक्षक रामेश्वर फुलवाड, राजू गाढवे, कैलास दाभाडे, वनकर्मचारी खंडू भुजबळ, कोंडीबा डोके तसेच बिबट रेस्क्यू टीमचे सदस्य किरण वाजगे, रमेश सोलाट, सुनील भालेराव, प्राणी मित्र पवन गोसावी, महेश बांदल, अशिष वाजगे, सुनिल गोंधळी आदींनी बिबट्याला वनविभागाच्या वाहनांमध्ये पुढील कार्यवाहीसाठी तसेच अंत्यसंस्कारासाठी रवाना केले.

Previous articleसरपंच सेवा महासंघाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी सुरज चौधरी यांची निवड
Next articleरोग्याला योगी बनविण्यासाठी नित्यनेमाने योगा करणे महत्वपूर्ण- जेष्ठ समाजसेवक डॉ रवींद्र भोळे