सरपंच सेवा महासंघाच्या हवेली तालुकाध्यक्षपदी सुरज चौधरी यांची निवड

अमोल भोसले,उरुळी कांचन

पेठ (ता.हवेली) गावचे सरपंच सुरज भालचंद्र चौधरी यांची सरपंच सेवा महासंघ हवेली तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

सरपंच सेवा महासंघाचे राज्य अध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे यांनी निवड केली. यावेळी संपर्क प्रमुख राहुल उके उपस्थित होते.

सरपंच महासंघाच्या माध्यमातून सरपंच बांधवाचे असणारे प्रश्न प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करणार असे तालूका अध्यक्ष सुरज चौधरी यांनी सांगितले.

सामाजिक जाणीव ठेवून स्वतःच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोरगरिबांना पंधरा दिवस पुरेल इतके जीवनावश्यक किरणा किटचे वाटप सरपंच सूरज चौधरी व मित्रपरिवार यांच्या वतीने पेठ – सोरतापवाडी – नायगाव – श्रीप्रयागधाम कामगार कॉलनी यापरिसरात करण्यात आले.

Previous articleखरपुड येथे किराणा किटचे वाटप
Next articleअज्ञात वाहनाच्या धडकेने बिबट्याचा जागीच मृत्यू