दौंड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आंबा महोत्सव साजरा

दिनेश पवार,दौंड

येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात अपरा एकादशी च्या मुहूर्तावर आंबा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते,160 ते 170 किलो आंब्याची आरास विठ्ठल-रुक्मिणी चरणी अर्पण करण्यात आली होती,दौंड हे प्रतिपंढरपूर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात ओळखले जाते,भीमेच्या काठावरती वसलेल्या दौंड ला ऐतिहासिक, धार्मिक वारसा आहे, भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्व असणारा हा आंबा महोत्सव मोठ्या उत्साहात दरवर्षी साजरा केला जातो,यावर्षी कोरोना च्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने दिलेल्या सर्व नियमांचे पालन करत हा महोत्सव साजरा करण्यात आला.

दौंड येथील गटणे परिवाराकडे येथील सेवेचा मान आहे, भाविकांनी आवश्यक ती खबरदारी घेवून,गर्दी न करता सुरक्षित अंतर ठेवून विठ्ठल-रुक्मिणी चे दर्शन घेतले.

या महोत्सवासाठी अध्यक्ष गोपाळराव नगरकर,उपाध्यक्ष अशोकराव जगदाळे, सचिव रामेश्वर मंत्री,सचिन कुलते,बाळकृष्ण कौवलगी,भवनभाई पोकार,शेखर शिंदे, प्रभाकर जोगळेकर, मंगेश गोलांडे,दीपक परदेशी तसेच सर्व भाविकांचे सहकार्य लाभले

Previous articleदोंदे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण
Next articleदौंड महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा