दोंदे येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण

राजगुरूनगर- दोंदे (ता.खेड) येथे जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपण कार्यक्रम करण्यात आला. ग्रामपंचायत दोंदे यांनी चालू आर्थिक वर्षामध्ये 1800 झाडांचे वृक्षारोपण आणि वृक्ष संवर्धन कार्यक्रम करण्याचे उद्दिष्ट हाती घेतले असून याकामी ग्रामपंचायत 14 ट्री फाउंडेशन या संस्थेचे अध्यक्ष प्रविण भागवत आणि व्यवस्थापक अनंत तायडे यांचे अनमोल सहकार्याने लाभले .

गावात सर्व रस्त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपण केले असुन याकामी गावातील शेतकऱ्यांनी त्यांच्या बांधावर वृक्षारोपण करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिल्याने हा वृक्षारोपणाचा कार्यक्रम अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडण्यास मदत मिळाली

यावेळी ग्रामपंचायत सरपंच चंद्रकांत बारणे, उपसरपंच सिद्धार्थ कोहिनकर, ग्रामसेवक निलेश पांडे, ग्रामपंचायत सदस्य हनुमंत कदम,किरण तनपुरे, सौ.वैशाली सुकाळे,सौ.सुनिता बनकर, सौ. सुरेखा बारणे, दत्ता दरवडे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Previous articleसकल जैन समाजाच्या वतीने अनूप मंडळावर कारवाई करण्याची मागणी
Next articleदौंड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आंबा महोत्सव साजरा