दौंड महाविद्यालयात शिवस्वराज्य दिन साजरा

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका कला व वाणिज्य महाविद्यालयात राज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने शिवस्वराज्य दिन साजरा करण्यात आला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस परीक्षा विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग बिडकर, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा. सुनील वाघ यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला,सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य जयंता ढेकणे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

कोरोना च्या प्रादुर्भावामुळे प्रशासनाने दिलेल्या नियमांचे पालन करत,गर्दी न करता,सॅनिटायजर,मास्क यांचा वापर करून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी किशोर लडकत, स्नेहा जगताप,निकिता जगताप,या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले,तर परीक्षा विभाग प्रमुख डॉ.पांडुरंग बिडकर, विद्यार्थी विकास मंडळ प्रमुख प्रा.सुनील वाघ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याविषयी विचार व्यक्त केले.

यावेळी खटावकर सर,मोदी सर,शिवाजी थोरात, रोहित गवळी,अभिमन्यू गिरमकर, कमलेश परदेशी उपस्थित होते

Previous articleदौंड येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आंबा महोत्सव साजरा
Next articleदुसर्‍याची भुक जाणतो तोच खरा सेवक – स.पो.नि दादासाहेब पवार