पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करुया-सरपंच विठ्ठल शितोळे

अमोल भोसले,उरुळी कांचन

पाच जून रोजी दरवर्षी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो या निमित्ताने पर्यावरण विषयक अनेक उपक्रम राबविले जातात सध्याच्या स्थितीत कोरोना महामारीमुळे आपल्याला ऑक्सिजनचे महत्व समजले असल्याने आपण जेवढे जास्त झाडे लावू तेवढेच वातावरण प्रदूषण विरहित असेल पर्यावरणाचे रक्षण आपल्या सर्वांनाच करायचे आहे हा संकल्प करुया असे मत कोरेगावमुळ (ता.हवेली) सरपंच विठ्ठल शितोळे यांनी केले.

शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ अमोल कोल्हे, आमदार अशोक पवार, जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राजलक्ष्मी फाउंडेशन कोविड सेंटर कोरेगावमुळ इनामदारवस्ती व ग्रामपंचायत कोरेगावमुळच्या संयुक्त विद्यमाने जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गावठाण हद्दीत दोनशे झाडाचे वृक्षारोपण उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक बापुसाहेब बोधे, उपसरपंच मनिषा कड, ग्रामपंचायत सदस्य भानुदास जेधे, दत्तात्रय काकडे, अमित सावंत, संतोष काकडे, आप्पा कड, प्रविण शितोळे, नंदू कड, सचिन निकाळजे, ग्रामपंचायत कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Previous articleकोण म्हणतं ७० वर्षात मराठ्यांना आरक्षण देण्याबाबत प्रयत्न झाले नाहीत ?.. विकास लंवाडे
Next articleजे बी एम कंपनीकडून महाळुंगे पोलीस चौकीला सुरक्षेतेसाठी संरक्षक बेरिगेट्स