जे बी एम कंपनीकडून महाळुंगे पोलीस चौकीला सुरक्षेतेसाठी संरक्षक बेरिगेट्स

चाकण- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण राज्यात संचार बंदी आहे तसेच कडक नियम व काही बंधने आहे. कोरोना महामारीची साखळी तोडायची असेल तर  निर्बंधा सह काही नियमावली सरकारने केली आहे. मोकार फिरणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी प्रशासनाने जागोजागी नाका बंदी केली आहे तसेच वाहनांकडून शिस्तीचेेे पालन व्हावे याच  पार्श्वभूमीवर जे बी एम कंपनीने महाळुंगे पोलीस चौकीला नाका बंदी व इतर काही बाबी लक्षात घेऊन बॅरिगेट्स दिले. या बॅरिगेट्स चा उपयोग नाकाबंदी सह इतर ठिकाणी शिस्तीचे पालन करण्यासाठी होणार आहे असे मत महाळुंगे पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांनी व्यक्त केले.

पोलिस निरीक्षक अराविंद पवार स्वतः परिसरातील वेगवेगळ्या भागात फेरफटका मारून नागरिकांना घरातच थांबण्याचे आवाहन करीत होते. अत्यावश्यक सेवेशिवाय अन्य कारणासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये. घरातच थांबावे विनाकारण कायदा-सुव्यवस्था मोडू नये. कायदा सुव्यवस्था मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही. प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहनही पवार यांनी   केले आहे.

यावेळी जे बी एम लि.चाकण चे मानव संसाधन विभाग प्रमुख अवधूत देसाई यांच्या हस्ते महाळुंगे  पोलीस चौकीचे निरीक्षक अरविंद पवार यांना दीले. यावेळी चाकण पोलीस विभागाचे राजेंद्र कोनेकरी व  जे बी एम ली. चे उपव्यवस्थापक मानव संसाधन सुमंत सिंग आदी प्रशासन आणि कंपनीचे  अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Previous articleपर्यावरणाचे रक्षण करण्याचा संकल्प करुया-सरपंच विठ्ठल शितोळे
Next articleसावरदरी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण