राजगुरुनगर शहर भ्रष्टाचार विरोधी समिती महिला अध्यक्षपदी डॉ.निता आल्हाट यांची निवड

राजगुरुनगर-अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीच्या महिला (राजगुरूनगर शहर) अध्यक्षपदी डॉ. सौ. निता आल्हाट यांची निवड करण्यात आली.

अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समिती, या संघटनेचा बैठकित हा निर्णय घेण्यात आला. यावेळी अन्याय अत्याचार भ्रष्टाचार विरोधी समितीचे संस्थापक अध्यक्ष सौदागर महमद रफी यांच्या आदेशाने व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा शर्मिलाताई शिंदे व खेङ तालुकाध्यक्षा मनिषा परदेशी यांनी निवड करुन त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

महाराष्ट्रात माहिती अधिकार, मानवीहक्क, पत्रकार संरक्षण,भ्रष्टाचार निर्मुलन, ग्राहक संरक्षण, कायद्याचा प्रचार, प्रसार करण्यात येणार आहे, त्याच प्रमाणे नागरिकांना व शासकीय घटकांना माहिती अधिकाराचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचे आल्हाट यांनी सांगितले. डॉ.निता आखाट यांनी विविध सामाजिक क्षेत्रात व राजकीय क्षेत्रात काम केले असून सामाजिक कार्य यापुढील काळात अधिक जोमाने करणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Previous articleयेरवडा कारागृहातून पळून गेलेल्या पाच आरोपीपैकी एका आरोपीस पकडण्यात दौंड पोलिसांना यश
Next articleअजितदादा पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी चाकण येथील संगिता वानखेडे या महिलेवर वर गुन्हा दाखल