अजितदादा पवार यांची बदनामी केल्याप्रकरणी चाकण येथील संगिता वानखेडे या महिलेवर वर गुन्हा दाखल

Ad 1

बाबाजी पवळे,पुणे

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत आक्षेपहार्य वक्तव्य केल्याप्रकरणी शिक्रापूर पोलीस स्टेशनमध्ये चाकण येथील संगिता वानखेडे या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल  करण्यात आला आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या विरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह विधान करून ती पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल करत बदणामी केल्याबाबत राष्ट्रवादीच्या शिरुर तालुक्यातील कोंढापुरी ग्रामपंचायतचे सरपंच स्वप्नील गायकवाड यांच्या तक्रारीवरुन चाकण येथील संगीता वानखेडे या महिलेविरोधात शिक्रापूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्रापूर पोलीस करत आहेत.