येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या पाच आरोपीपैकी एका आरोपीस पकडण्यात दौंड पोलिसांना यश

दिनेश पवार,दौंड (प्रतिनिधी)

येरवडा कारागृहातून पळून गेलेल्या पाच पैकी एका आरोपीला दौंड पोलिसांनी सिनेस्टाईल पद्धतीने अटक केली आहे

गणेश अजिनाथ चव्हाण (वय 22 वर्षे रा. बोरावके नगर ,तालुका दौंड जिल्हा पुणे.)असे आरोपीचे नाव असून त्यास लिंगाळी तालुका. दौंड.सापळा रचून पाठलाग करत पकडण्यात आले आहे.

या आरोपीस ताब्यात घेऊन,येरवडा पोलीस स्टेशन,पुणे शहर यांकडे सुपूर्द करण्यात आले.पुणे शहरात असणाऱ्या येरवडा जेल मधून रात्री खिडकीचे गज कापून पाच कैदी फरार झाले होते. या कैद्यांमध्ये देवगण चव्हाण, अक्षय चव्हाण, गणेश चव्हाण,अजिंक्य कांबळे,आणि सनी पिंटो यांचा समावेश होता.यातील तिघे दौंड तालुक्यातील असून यांच्यातील एकास पकडण्यात दौंड पोलिसांना यश आले आहे.या आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस उपअधीक्षक ऐश्वर्या शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक सुनिल महाडिक, सहा.फौजदार.डी.जी. भाकरे,पो हवा कल्याण शिंगाडे,पो.हवा. असिफ शेख,पो.हवा.पांडुरंग थोरात, पो.ना. अण्णासाहेब देशमुख, पो.ना. सचिन बोराडे,पो.कॉ.अमोल देवकाते, पो.कॉ. राहुल वाघ,पो.कॉ.अमोल गवळी, पो.कॉ.अमजद शेख, पो.कॉ. अक्षय घोडके,पो.कॉ.किरण राऊत,पो. कॉ. शैलेश हंडाळ,पो.कॉ.अण्णासाहेब करे, होमगार्ड गजानन थोरात,सौरभ कापरे, पो.मित्र.सूरज फाळके यांनी या कारवाईत  सहभाग नोंदवला. आरोपीला अवघ्या 36 तासात दौंड पोलिसांनी त्वरित अटक केल्याने सर्व स्तरातून दौंड पोलिसांचे शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

Previous articleलोकशाहीर अण्णाभाऊंच्या वास्तववादी साहित्यामुळे… राज्यातील मानवतावाद, शोषणमुक्तीच्या लढ्याला बळ – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleराजगुरुनगर शहर भ्रष्टाचार विरोधी समिती महिला अध्यक्षपदी डॉ.निता आल्हाट यांची निवड