“मदत नव्हे कर्तव्य” श्रीमंत प्रतिष्ठाण मार्फत रोज १०० जणांना अन्नदान

अमोल भोसले,पुणे

कोरोना काळात आपण घरात सुरक्षित आहोत, आपली काळजी घ्यायला आपले कुटुंब सोबत आहे. परंतु जे निराधार आहेत त्यांचे काय? असा विचार काही तरूणांच्या मनात आला व त्यांनी श्रीमंत प्रतिष्ठाण च्या माध्यमातून निराधार गरजूंना मदतीचा हात पुढे केला आहे.

कोरोना काळात कष्टकरी वर्ग, निराधार, गरजू यांना पोटाची आग भागवता येणे अवघड झाले. श्रीमंत प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष समीर आमले यांनी ही खदखद आपल्या सवंगड्यांपुढे व्यक्त केली. त्यांनी देखील त्वरीत होकार देत अन्नदानाच्या या यज्ञकर्मात आपली समिधा देण्याचे निश्चित केले.

धनकवडी भागातून सुरू झालेले हे समाजसेवेचे व्रत नंतर पद्मावती, सहकारनगर, सारसबाग, शनिवारवाडा, दगडुशेठ हलवाई मंदिर या भागातही पसरले. प्रतिष्ठाणचे अध्यक्ष अथर्व जरे व कार्याध्यक्ष गणेश शिंदे हे असून या उपक्रमात कार्तिक कदम, निखिल कन्हेरकर, मार्तंड धडफळे, बंटी शिंदे, प्रणव जाधव, प्रथमेश गुंड, राजस पापळ, सौदागर लोखंडे, अभय जवंझाळ, महिंद्र जहिरे यांची मोलाची साथ मिळाली. प्रतिष्ठाणला मोठ्या प्रमाणात देणगी व अन्नधान्याच्या स्वरूपात मदत मिळत आहे असे समीर आमले यांनी सांगितले.

Previous articleदौंड तालुक्यात गावठी दारू हातभट्टीवर पोलीसांची कारवाई
Next articleदौड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई