दौड मध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानांवर कारवाई

दिनेश पवार,दौंड

शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असताना कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांना वारंवार सूचना देऊन ही सूचनांचे पालन करताना काही दुकानदार दिसत नाही याची दखल दौंडचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी गांभीर्याने घेऊन जे दुकानदार नियमांचे उल्लंघन करतील त्यांचे दुकान लॉक डाऊन संपेपर्यंत सील करण्याचे प्रस्ताव माननीय तहसीलदार यांना पाठवले होते. त्यामध्ये मकसाने सुपर मार्केट सरपंच वस्ती,सपना ड्रेसेस, आहूजा मोबाईल शॉप सराफ दुकानाच्या मागे गांधी चौक, ओम बँगल्स अँड गिफ्ट हाऊस आंबेडकर चौक यांचा प्रस्ताव तहसीलदार यांनी मंजूर केला. त्यानंतर ही चार दुकाने पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आले असून त्याची अंमलबजावणी दौंड नगरपालिकेच्या सहकार्याने चालू आहे.

तसेच अशा प्रकारचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदारांवर यापुढेही अशीच कडक कारवाई करण्याचा इशारा पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी दिला आहे

Previous article“मदत नव्हे कर्तव्य” श्रीमंत प्रतिष्ठाण मार्फत रोज १०० जणांना अन्नदान
Next articleदौंड मधील युवकांनी केली अन्नदानाला सुरुवात