दौंड तालुक्यात गावठी दारू हातभट्टीवर पोलीसांची कारवाई

दिनेश पवार,दौंड- तालुक्यातील मलठण गावच्या हद्दीत (दि. 22) रोजी चव्हाण वस्ती येथे ओढ्याच्या कडेला काटवणात अवैध दारू भट्टी सुरू असल्याची खात्रीशीर माहिती दौंड पोलीस निरीक्षक नारायण पवार यांना समजताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे,पोलीस कॉन्स्टेबल करे, राऊत यांच्या सह छापा टाकून मोठी कारवाई करत अंदाजे दोनशे लिटर चे 10 प्लॅस्टिक ड्रम मध्ये 1500 लिटर भरलेले कच्चे रसायन व 500 लिटर मापाची एक लोखंडी पत्र्याची टाकी असा 31500 रुपयांचा माल जागीच नष्ट करून निलेश जगन्नाथ लोंढे याच्यावर दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पो.ना.वलेकर करत आहेत.सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली

Previous articleवडगाव पाटोळे येथे नागरिकांची अँटिजेन तपासणी
Next article“मदत नव्हे कर्तव्य” श्रीमंत प्रतिष्ठाण मार्फत रोज १०० जणांना अन्नदान