वडगाव पाटोळे येथे नागरिकांची अँटिजेन तपासणी

राजगुरूनगर- वडगाव पाटोळे (ता.खेड) येथे प्राथमिक उपकेंद्र दोंदे व ग्रामपंचायतीच्या संयुक्त विद्यमानाने माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षण अंतर्गत संपूर्ण गावामध्ये सर्वे करून संशयित पेशंट व कोरोना रुग्णांच्या संपर्कातील सर्वांची रॅपिड अँटीजेन टेस्ट केली. यावेळी 80 संशयितांपैकी 11 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

माझे कुटुंब माझी जबाबदारी या सर्वेक्षणासाठी 21 शिक्षकांनी मोलाची मदत केली. तसेच डॉ.प्रशांत फुगे, डॉ भाग्यश्री पाटील, प्रतिभा कारले व गावातील आशा वर्कर तसेच वडगावच्या सरपंच सौ शामलताई विशाल तोत्रे, उपसरपंच अमीर शेठ पाटोळे, ग्रामपंचायत पंचायत सदस्य योगेशभाऊ नेहेरे, कुमारभाऊ गायकवाड, ग्रामसेवक महाजन भाऊसाहेब, ऑपरेटर सागर सावंत उपस्थित होते.

Previous articleशाळेच्या आवारात दारू आणि मटणाची पार्टी ; चौघांवर गुन्हा दाखल
Next articleदौंड तालुक्यात गावठी दारू हातभट्टीवर पोलीसांची कारवाई