Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजगुरूनगर : खेड तालुक्यातील टाकळकरवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेच्या आवारातच चक्क दारू आणि मटणाची पार्टी झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत खेड पोलिसांनी ४ जणांना ताब्यात घेतले असुन त्यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक केली आहे.अशी माहिती खेड पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक सतीश गुरव यांनी दिली.

अनुप टाकळकर, निखिल येवले, राजेश पवार, मयुर टाकळकर ( रा.टाकळकरवाडी (ता खेड ) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकांची नांवे आहे.

कोरोनाचा काळ व सध्या उन्हाळी सुट्टी असल्यामुळे शाळा बंद आहेत. जिल्हा परिषद शाळा आवारात दिवसाढवळ्या लॉक डाऊनचा दुरुपयोग करीत या परिसरातील या मद्यशौकिनांनी दारूचा अड्डा बनविला होता. रोज भरदुपारी व रात्र झाल्यानंतर यथेच्छ दारू ढोसली जात असल्याचे वास्तव दिसत होते. तसेच मटन व मांस शिजवण्यात येत होते. अन्न शिजविण्यासाठी शाळेच्या आवारात विटाची चुल तयार केली होती.या ठिकाणी पडलेल्या रिकाम्या दारूच्या बॉटल्स, प्लॅस्टिक ग्लास ,विविध खाद्यपदार्थाचे रिकामी पाकीट अस्ताव्यस्त पडलेल्या याची साक्ष देतात गेल्या महिन्यांपासून हा प्रकार सुरू होता. अतिशय निंदनीय, लज्जास्पद व भयानक वास्तव समोर असताना या गंभीर प्रकाराकडे ना ग्रामपंचायतने लक्ष दिले, ना शालेय समितीने, ना मुख्याध्यापकां कडून याची दखल घेतली गेली. तेरी भी चूप, मेरी भी चूप अशा प्रकारची अवस्था होती.गावातील काही ग्रामस्थांनी वेळोवेळी या तरुणांना समज दिली होती.मात्र तरुण कोणाचेही ऐकत नव्हते. शाळेच्या आवारात अनेक ठिकाणी दारूच्या रिकाम्या व फोडलेल्या बाटल्या आढळून आल्या आहेत.
Download WordPress Themes Nulled and plugins.