दिवे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात बहरणारं ‘देवराई’

गणेश सातव,वाघोली

पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्याच्या दिवे गावच्या परिसरात असणाऱ्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या २५ एकर परिसरात विविध देशी पर्यावरणपूरक १००० वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे.या पार्श्वभूमीवर दिवे कार्यालयाचे प्रमुख श्री.झगडे सो यांनी थेऊर येथील ‘सह्याद्री देवराई’ रोपवाटिकेला नुकतीच भेट दिली.

यावेळी उपस्थित सह्याद्री देवराईचे संस्थापक रघुनाथ ढोले व धनंजय शेडबाळे यांच्याशी चर्चा करुन परिवहन कार्यालय परिसरात कोणकोणते वृक्ष, वेली,गवत लावले पाहिजेत याबाबत माहिती घेण्यात आली.

या वृक्ष लागवडीने
दिवे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाचा परिसर पुढील १-२ वर्षातचं प्रदुषणमुक्त होऊन हिरव्यागार वनराईने बहरणारं आहे.

 

यावेळी सह्याद्री देवराईचे रघुनाथ ढोले,धनंजय शेडबाळे ,निसर्ग राजा मित्र जिवांचे संस्थेचे राहुल घोलप व निसर्गमित्र सुहास हे उपस्थित होते.

Previous articleनिधीची तरतूद होऊनही खाजगी शाळा अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेतच
Next articleथेऊर येथील ‘सह्याद्री देवराई’ रोपवाटिकेत बीयांपासून रोपनिर्मीतीची लगबग