थेऊर येथील ‘सह्याद्री देवराई’ रोपवाटिकेत बीयांपासून रोपनिर्मीतीची लगबग

गणेश सातव, वाघोली

जुन महिना सुरु झाला कि पाऊसाचे आगमन होते आणि अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यासाठी वेगवेगळ्या निसर्गसेवा संस्था,ग्रुप यांची लगबग सुरु होत असते.या वृक्षारोपनासाठी तयार होणाऱ्या झाडांसाठी आधी बीयांपासून रोपांची निर्मिती करावी लागते.मगचं आपल्याला हि वाढलेली झाडे पहायला मिळतात.

थेऊर येथील ‘सह्याद्री देवराई’ रोपवाटिकेतही देवराईचे रघुनाथ ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील निसर्गप्रेमी,वृक्षप्रेमी कार्यकर्त्यांनी वर्षभर साठवलेल्या व देवराईकडे सुपुर्द केलेल्या अनेक देशी दुर्मिळ वनस्पतींच्या बीयांपासून रोपनिर्मीतीला सुरुवात झाली आहे.यात वड,पिंपळ,उबंर, आवळा, अर्जुन,बहावा,सोनचाफा,काटेसावर,पळस,पांगारा आदी पर्यावरणपूरक वृक्षांचा समावेश असतो.

यासाठी सर्व प्रथम रोपवाटिकेत गादी वाफ्यावर बियांची पेरणी करणे,खत-मातीने पिशव्या भरणे,उगवलेली चांगली रोपे पिशवीत लावणे आदी कामांची लगबग सध्या पहायला मिळत आहे.सध्या या निसर्ग सेवाकार्यासाठी २० ते २५ जणांचे हात दिवसरात्र राबत आहेत.

Previous articleदिवे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या परिसरात बहरणारं ‘देवराई’
Next articleपत्रकार सुरेश वांढेकर यांच्या वाढदिवसानिमित्त बकोरीच्या डोंगरावर वृक्षारोपण