भीमाशंकर परिसरात वादळात अनेक घरांचे नुकसान

राजगुरूनगर- कोरोनाच्या संकट काळात तौत्के चक्रीवादळाचे नवीन संकट उत्तर पुणे जिल्ह्याच्या खेड आंबेगाव जुन्नर तालुक्याच्या पश्चिमकडील भागात उभे रहाले असून आज पहाटेच्या सुमारास भीमाशंकर परिसरातील भोरगिरी,भिवेगाव व इतर १५ गावांमध्ये वादळी वा-यासह पावसाच्या सरी झाल्या यामध्ये भिवेगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेवरील छतही उडाल्याची घटना घडली आहे.

 

मागील वर्षाच्या चक्रीवादळात सर्वाधिक फटका प्राथमिक शाळांना बसला होता. नव्याने उभारण्यात आलेल्या शाळांचे छत चक्रीवादळात वादळात उडाले होते. त्या घटनेची आता पुनरावृत्ती झाली आहे. आज पहाटे भिमाशंकर परिसरातील शाळा व घरांची छत उडाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे आदिवासी नागरिकांसह शासकिय मालमत्तेची मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

सह्याद्री पर्वत रांगाच्या कुशीत तौक्ते चक्रीवादळाचा फटाका बसत आहे. सह्याद्रीच्या कुशीतील पर्वत रांगांमध्ये आदिवासी समाज वास्तव्यास आहे. आधीच कोरोनाच्या संकटात मागील एक वर्षापासुन संघर्ष करत असताना आता नव्याने आलेले तौत्के चक्रीवादळाचे संकट मोठं नुकसान करत आहे. त्यामुळे शासकिय पातळीवरील आपत्ती व्यवस्थापनाने तात्काळ पंचनामे करत आदिवासी भागात मदतीसाठी पुढे यावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Previous articleखतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार -जयंत पाटील
Next articleसहा महिन्यांपासून फरार अन् सोळा गुन्हे दाखल असलेल्या सराईत चंदन तस्कराला अटक