खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्याने केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभर आंदोलन करणार -जयंत पाटील

अमोल भोसले पुणे

पेट्रोल शंभरी पार केल्यानंतर केंद्राने आता दुसरा धक्का देत खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून शेतकऱ्यांचं कंबरडं मोडण्याचं काम केलं असून केंद्राच्या या धोरणाचा निषेध म्हणून राज्यभर राष्ट्रवादी काँग्रेस आंदोलन करणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली आहे.

पेट्रोल – डिझेलच्या दरवाढीनंतर आता केंद्रसरकारने दुसरा धक्का दिला आहे. खतांच्या किंमती भरमसाठ वाढवल्या आहेत. १०.२६.२६ ची किंमत ६०० रुपयांनी वाढली तर डीएफएची किंमत ७१५ ने वाढली आहे. डिएफए जी अगोदर ११८५ रुपये किंमत होती ती आता १९०० रुपयांना मिळणार आहे. १०.२६.२६ च्या ५० किलोच्या पोत्याला ११७५ ऐवजी १७७५ रुपये मोजावे लागणार आहे. पोटॅशच्या किंमतीही वाढल्या आहेत असेही जयंत पाटील म्हणाले.

देशातील खतांची किंमत मोठ्या प्रमाणात वाढवण्याचं पाप केंद्रातील भाजप सरकारने केलं आहे. राष्ट्रवादीतर्फे राज्यातील प्रत्येक जिल्हयात शेतकऱ्यांवर वेगळया प्रकारचा बोजा लादला असून केंद्राने ही दरवाढ तात्काळ मागे घ्यावी अशी मागणी जयंत पाटील यांनी केली आहे

Previous articleश्रीप्रयागधाम हॉस्पिटलमध्ये लवकरच ऑक्सीजन बेड उपलब्ध करून देऊ – खासदार डॉ अमोल कोल्हे
Next articleभीमाशंकर परिसरात वादळात अनेक घरांचे नुकसान